mukund khanore from badalapur named his bungalow share market chi krupa

देवाची कृपा, आई-वडिलांची कृपा किंवा एखाद्या देवाचे नाव, मुलांची नाव सहसा घरांना दिली जातात. पण एका व्यक्तीने त्यांच्या घराला काही तरी हटके नाव दिल्याने सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू आहे. बदलापूर येथे एका व्यक्तीने ते जे काम करतात त्यावरून त्यांच्या बंगल्याचे नाव देऊन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बदलापूरच्या या बंगल्याचे नाव आहे चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’. हे नाव ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे मुकुंद खानोरे(mukund khanore from badalapur named his bungalow share market chi krupa).

    बदलापूर : देवाची कृपा, आई-वडिलांची कृपा किंवा एखाद्या देवाचे नाव, मुलांची नाव सहसा घरांना दिली जातात. पण एका व्यक्तीने त्यांच्या घराला काही तरी हटके नाव दिल्याने सोशल मीडियावर त्यांची चर्चा सुरू आहे. बदलापूर येथे एका व्यक्तीने ते जे काम करतात त्यावरून त्यांच्या बंगल्याचे नाव देऊन अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बदलापूरच्या या बंगल्याचे नाव आहे चक्क ‘शेअर मार्केटची कृपा’. हे नाव ठेवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे मुकुंद खानोरे(mukund khanore from badalapur named his bungalow share market chi krupa).

    फेसबुकवर पोस्ट

    त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या नावाची माहिती फेसबुकवर पोस्ट करून दिली. त्यांनी बंगल्याचा फोटोही पोस्ट केला आहे. त्यांनी फोटोला कॅप्शन दिले की ‘माझा नवीन बंगला जो साकारला शेअर मार्केट च्या माध्यमातून शेअर मार्केटची कृपा. चार दिवसांपूर्वीच्या या पोस्टमुळे मुकुंद खानोरे चांगलेच चर्चेत आले आहेत. मुकुंद खानोरे हे शेअर बाजारात मोठ नाव आहे. ते मूळचे बदलापूरचे आहेत. आपल्या अनुभव आणि मेहनतीमुळे खानोरे हे आज शेअर बाजार क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात.

    असे नाव का ठेवले ?

    शेअर बाजारात खूप काम करून, मेहनत करून नाव कमावल्यानंतर उत्तम पैसे मिळाल्यावर मुकुंद खानोरे यांनी बदलापूरमधील कासगावमध्ये मोठा भूखंड खरेदी केला. त्याच भूखंडावर त्यांनी हा बंगला बांधला. त्यांच्या कामामुळे, शेअर मार्केटमुळेच ते हा बंगला बांधू शकले आणि म्हणूनच त्यांनी असे नाव ठेवल्याचे ते सांगतात.