मुंबई महापालिका जाणार भाजपच्या ताब्यात; मंत्री रामदास आठवले यांचे भाकीत

चार राज्यांच्या निवडणुकीचा सर्वात मोठा परिणाम हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बघावयास मिळेल आणि मुंबई महापालिकेवर आगामी महापौर हा भाजपचा तर उपमहापौर आरपीआयचा असेल असा विश्वास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

  धुळे : चार राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशाचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्र राज्यामध्ये देखील आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल; असा विश्‍वास यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

  तसेच या चार राज्यांच्या निवडणुकीचा सर्वात मोठा परिणाम हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बघावयास मिळेल आणि मुंबई महापालिकेवर आगामी महापौर हा भाजपचा तर उपमहापौर आरपीआयचा असेल असा विश्वास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

  केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज धुळे दौऱ्यावर आले होते. या दरम्यान मंत्री आठवले यांनी धुळ्यात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी संवाद साधला. पाच राज्यांमध्ये हाती आलेल्या निकालात काँग्रेसचा धक्कादायक असा पराभव झाला असल्यामुळे काँग्रेसने आता गांधी परिवाराचे नेतृत्व बदलण्याची वेळ आली असल्याचे मंत्री रामदास आठवले म्हणाले.

  एसटी कर्मचार्यांचा तिढा सोडविण्यात सरकार अपयशी

  राज्यात परिवहन मंत्री राहुन चुकलेल्या केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सध्या एसटी महामंडळाचा सुरू असलेला तिढा सोडविण्यात राज्य सरकार अपयशी ठरला असल्याचा देखील टोला लगावत राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना विलगीकरण यापासून दूर ठेवत असल्याचे मत व्यक्त केले आहे.

  म्‍हणून पंजाबमध्‍ये भाजप आले नाही

  त्याचबरोबर चार राज्यांमध्ये भाजपला मित्रपक्षांच्या मदतीने चांगल्या पद्धतीने यश संपादन करता आले आहे. परंतु पंजाबमध्ये भाजपचा निर्णय चुकल्याने पंजाबमधून भाजपला सत्ता मिळवता आली नसल्याचे देखील मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना आपले मत व्यक्त केले आहे.