सलमान खानला धमकी प्रकरण: मुंबई पोलीस पालघरमध्ये दाखल; सीसीटीव्हीमध्ये दिसली संशयित व्यक्ती

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ५ जून रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई क्राइम ब्रांच पालघरमध्ये दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित व्यक्ती दिसला होता. तोदेखील पालघरला गेला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालघरमध्ये मुंबई पोलीस चौकशी करण्याकरिता दाखल झाले आहेत(Mumbai police files case against Salman Khan).

    मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ५ जून रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. या प्रकरणाचा तपास करणारे मुंबई क्राइम ब्रांच पालघरमध्ये दाखल झाली आहे. मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित व्यक्ती दिसला होता. तोदेखील पालघरला गेला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पालघरमध्ये मुंबई पोलीस चौकशी करण्याकरिता दाखल झाले आहेत(Mumbai police files case against Salman Khan).

    गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपी लॉरेन्स बिश्नोईचा साथीदार गुंड विक्रम बराड यानेच हे धमकीचे पत्र सलमान खान यांचे वडील सलीम खान यांच्यापर्यंत पोहोचविले होते, अशी माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. सलमान खानला मिळालेल्या धमकी पत्राची चौकशी करण्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे.

    राजस्थानमधील जलोरामधून आलेले तीन संशयित पालघरमध्ये थांबले होते. याची माहिती मिळवण्सासाठी मुंबई क्राईम ब्रांचची टीम पालघरमध्ये दाखल झाली आहे. मुंबई क्राईम ब्रांचच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानच्या वडिलांना ज्याठिकाणी धमकीचे पत्र मिळाले.

    विक्रम बराड हा भारताबाहेर पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशीदेखील माहिती समोर आली आहे. सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना रविवार, ५ जून रोजी धमकीचे पत्र मिळाले होते. सलमानचाही सिद्धू मूसेवाला करू अशी धमकी त्याला देण्यात आली होती.

    या धमकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या गृहविभागाला मिळताच सलमानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटच्या बाहेर क्राईम ब्राँचची एक टीम तात्काळ दाखल झाली होता. ज्या ठिकाणी धमकीचे पत्र मिळाले त्या ठिकाणी पोलिसांकडून तपास सुरू होता. सलमान स्वत घराबाहेर येऊन क्राईम ब्राँचच्या टीमला सहकार्य करताना दिसला होता.