अटक करतानाचा फेक व्हिडिओ बनवणं उर्फीच्या अंगलट, मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल!

बनावट अटकेच्या या व्हिडिओवरपोलिसांनी कारवाई केली असून उर्फीवर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    आपल्या विचित्र कपड्यांने सोशल मीडियावर खळबळ माजवणाऱ्या उर्फी जावेदला (Urfi javed) तिनेचं केलेलं कृत्य आता मोठ्या अडचणीत टाकण्याची शक्यता आहे. शुक्रवारपासून उर्फीचा (Urfi javed arrested)  मुंबई पोलिसांकडून अटक करतानाचा व्हिडिओ (fake video)  व्हायरल होत आहे. ज्यामध्ये विचित्र कपडे परिधान केल्याबद्दल पोलीस त्यांना अटक करत असल्याचं सांगण्यात आलं होता. मात्र, चौकशीअंती तो व्हिडिओ बनावट असल्याचं उघड झालं असून आता या अटकेच्या या व्हिडिओवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. उर्फीवर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     नेमका प्रकार कायं?

    उर्फी मुंबईतील लोंखडवाला परिसरातील एक कॅफेमध्ये बसली असून तिथे पोलिसांची गाडी येते आणि दोन महिला कॅान्स्टेबल तिला अटक करतानचा व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर फिरत आहे. अनेकांना हा व्हि़डिओ खराही वाटला मात्र, हा व्हिडिओ खरा नसून प्रसिद्धीसाठी उर्फीनं हा बनावट अटकेचा व्हिडिओ बनवल्याचं समोर येत आहे. उर्फीचा हा फेक अरेस्टच्या अटकेचा हा व्हिडिओ बनावट होता, जो त्याने एका फॅशन ब्रँडचा प्रचार करण्यासाठी बनवला होता. बनावट अटकेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आता तिच्यावर कारवाई केली आहे.

    मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण

    मुंबई पोलिसांनी काल संध्याकाळी आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर बनावट अटकेचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. उर्फीच्या व्हिडिओचा अस्पष्ट स्क्रीनशॉट घेत, मुंबई पोलिसांनी पोस्टमध्ये कॅप्शनसह लिहिले – स्वस्त प्रसिद्धीसाठी कोणीही देशाच्या कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही! मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लील कृत्य केल्याप्रकरणी अटक केल्याचा व्हायरल झालेला व्हिडिओ खरा नाही.

    अनेक कलमान्वये गुन्हा दाखल

    मुंबई पोलीस (मुंबई पोलीस उर्फी जावेद) यांनी सोशल मीडियावर आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे – चिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर झाला आहे. आणि पोलिसांनी या फेक व्हिडिओमध्ये सामील असलेल्या लोकांविरुद्ध कलम 171, 419, 500, 34 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओमध्ये बनावट पोलिस अधिकारी असून वाहनही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नेहमी अतरंही कपड्यामुळे ट्रोल होणाऱ्या उर्फीला यावेळी प्रसिद्धीसाठी केलेलं हे कृत्या चांगलच महागात पडलं आहे.