महापालिकेने साहित्यप्रेमींना सुविधा पुरविण्याचा केला निर्धार; दररोज करणार ५ लाख लिटर पाणी पुरवठा

दररोज या संमेलनासाठी किमान पाच लाख लिटर पाण्याची यवस्था ठेवायला हवे, त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन करायचे आहे. चोवीस तास पाणी उपलब्ध राहण्यासाठी गरज पडल्यास पाण्याचे टँकर उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

  नाशिक,
  पालक संस्था या नात्याने महापालिकेने शहरात येणाऱ्या साहित्यिक साहित्यप्रेमी तसेच नागरिकांना सेवा सुविधांची वानवा पडू नये, यासाठी कंबर कसली असून या संदर्भात अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महापािलकेतील खातेप्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्व सुविधा चाेखपणे पुरविण्याचा निर्धार केला.

  महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवन मधील अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या दालनात झालेल्या खाते प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सेवा सुवि धां बाबत निर्णय घेण्यात आला. या बैठकीला आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोजे, पाणी पुरवठा विभागाचे शवि ाजी चव्हाणके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राजेंद्र पाटील मलेरिया विभागाचे डॉ. राजेंद्र त्र्यंंबके, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ. आ वेश पलोड, वि द्युत विभाग तसेच ड्रेनेज या सर्वच विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते.

  यावेळी कुसुमाग्रज नगरीकडे जाणारे सर्व रस्ते चकाचक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले असून कुठल्याही परिस्थितीत संमेलन स्थळी येणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता झालीच पाहिजे, अशा सूचनाही अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या. त्यामुळे कुसुमाग्रज नगरीकडे जाणाऱ्या रस्त्यांची स्वच्छता ठेवण्याचे काम आरोग्य विभागाला करावे लागणार आहे. नाशिक शहरात प्रेक्षणीय असे धार्मिक, ऐतिहासिक ववि िध स्थळे असून या स्थळांची स्वच्छता करण्याचे आदेशही देण्यात आले.

  राज्यभरातून येणाऱ्या साहित्यप्रेमी तसेच नागरिकांनाही साहित्य संमेलनानिमित्त आल्यानंतर या स्थळांना भेटी देण्याचा मोह आवरणार नाही. नाशिकच्या नावलौकिकात भर पडावी म्हणून ही पर्यटन स्थळे धार्मिक स्थळे ऐतिहासिक स्थळे स्वच्छ दिसायला हवी याची खबरदारी घनकचरा व्यवस्थापन विभागाने घ्यायची आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अस्वच्छता दिसता कामा नये असेही यावेळी त्यांनी बजावले.

  विभागीय अिधकारी सज्ज

  विभागीय स्वच्छता निरीक्षक तसेच सर्व विभागीय अधिकारी यांनाही याबाबत सक्त सूचना देण्यात आल्या .संमेलन स्थळी आत मधील स्वच्छता करण्यासाठी संमेलनाच्या वतीने यवस्था करण्यात आली आहे. मुख्य सभामंडप व त्या परिसरातील मागील बाजूस असलेले ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालया समोरुन येणारे रस्ते त्याचप्रमाणे इतर ठिकाणचे ही रस्ते स्वच्छ व्हायला हवेत.या भागातील विद्युतचे खांब उभे आहेत, तेथील विद्युत पुरवठा सुरळीत करायला हवा. लाइट बंद पडायला नको याची खबरदारी विद्युत विभागाने घ्यायचची आ हे. त्याचप्रमाणे आकस्मिक काही घटना घडू नये यासाठी फायर ब्रिगेडलाही सज्ज राहायच्या सुचना देण्यात आ ल्या. या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या गाड्याही सज्ज ठेवाव्यात असे आदेश अग्निशामक दलाला देण्यात आले.

  ५ लाख लिटर पाणी
  दररोज या संमेलनासाठी किमान पाच लाख लिटर पाण्याची यवस्था ठेवायला हवे, त्यादृष्टीने पाणीपुरवठा विभागाने नियोजन करायचे आहे. चोवीस तास पाणी उपलब्ध राहण्यासाठी गरज पडल्यास पाण्याचे टँकर उभे करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली बसलेले फुल विक्रेते तसेच इतर रहवि ाशी यांना त्वरित या ठिकाणाहून काढून शेल्टर रूममध्ये जमा करण्याच्या सूचना अतिक्रमण विभागाला देण्यात आल्या. कुठल्याही प्रकारे संमेलन काळामध्ये रस्त्यावर अथवा त्या परिसरामध्ये अतिक्रमण होणार नाही याची खबरदारी अतिक्रमण विभागाने घ्यायची आहे.

  काेराेनाची काळजी
  संमेलन काळात वैद्यकीय व आरोग्य विभागाने वि शेष काळजी घ्यायची आ हे. गरज पडल्यास अण्टीजेन तसेच आ रटीपीसीआ र चाचण्या बाबत मराठा विद्या प्रसारक समाजाच्या रुग्णालयात तसेच अपोलो रुग्णालय यांना पत्र दिले आहे. त्याचप्रमाणे संमेलनस्थळी दोन दवि सात सर्व खातेप्रमुखांनी पाहणी करून त्या ठिकाणी येणाऱ्या सर्वांचीच सेवासुविधा राहील याची खबरदारी घेण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.