महिलेला भेटण्यास आलेल्या व्यक्तीचा नागरिकांकडून खून..! रिक्षाचालक गंभीर जखमी

उरूळी कांचन (Uruli Kanchan) येथून कोंढव्यातील एका महिलेला भेटण्यास आलेल्या व्यक्तीचा खून (Murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, रिक्षाचालकाला देखील बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यात रिक्षाचालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

    पुणे : उरूळी कांचन (Uruli Kanchan) येथून कोंढव्यातील एका महिलेला भेटण्यास आलेल्या व्यक्तीचा खून (Murder) करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, रिक्षाचालकाला देखील बेदम मारहाण करण्यात आली असून, त्यात रिक्षाचालक देखील गंभीर जखमी झाला आहे.

    रवी कचरू नागदिवे (वय ५०, रा. उरूळी देवाची) असे खून झालेल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रवी हा येवलेवाडी परिसरातील एका महिलेला भेटण्यास आला होता. तो रिक्षा करून येवलेवाडीत आला. हा प्रकार लक्षात येताच येथील नागरिकांनी रवी याला बेदम मारहाण केली. तर, रिक्षाचालकाला देखील बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत रवी याचा मृत्यू झाला आहे. तर, रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.

    दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला असून, कोंढवा पोलीसांकडून अद्यापही याबाबत ठोस माहिती मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे.