अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम अन् सरकारी नोंदीसाठी हिंदू?; नवाब मलिकांचा वानखेडेंवर गंभीर आरोप

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आता आणखी एक नवा आरोप केला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला ट्वीट करत केला आहे.

    मुंबई : राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आता आणखी एक नवा आरोप केला आहे. समीर वानखेडेंच्या मातोश्री जाहिदा यांचे दोन मृत्यूचे दाखले बनवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला ट्वीट करत केला आहे.

    दरम्यान नवाब मलिकांनी यांनी ट्विट करत या आरोपाच्या संदर्भात दोन कागदपत्रेही जोडली आहेत. आणि ट्विटमध्ये म्हटलं आहे की, आणखी एक फर्जीवाडा, अंत्यसंस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी नोंदीसाठी हिंदू? असा सवाल करत मलिक यांनी वानखेडेंवर फर्जीवाडा केल्याचा आरोप केला आहे.

    मलिकांनी नेमकं काय म्हटलं आहे?

    नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये समीर वानखेडे यांच्या आई जाहिदा यांचे मृत्यूचे दाखले जोडले आहेत. या मृत्यूच्या दाखल्यांच्या आधारे नवाब मलिक दावा करत आहेत की, जाहिदा यांच्यावर मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत्यूच्या एका दाखल्यात जाहिदा यांचा धर्म हिंदू असे लिहिले आहे. तर दुसऱ्या प्रमाणपत्रात जाहिदा यांचा धर्म मुस्लिम असल्याचं म्हटलं आहे. जाहिदा यांचे निधन 16 एप्रिल 2015 रोजी झाले. मृत्यूचा पहिला दाखला 16 एप्रिल 2015 रोजी तयार करण्यात आला ज्यामध्ये जाहिदा यांचा धर्म मुस्लिम असे लिहिले होते. त्यामुळे आता नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा नवीन आरोप करत खळबळ माजवली आहे.