काँग्रेसमध्ये ५ जणांची बंडखोरी, नाना पटोलेंनी एका रात्रीत केली मोठी कारवाई

    भंडारा (Bhandara) : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात भंडारा काँग्रेसमध्ये बंडख़ोरीचे वातावरण असल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार, काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

    मध्यरात्री नाना पटोले यांनी ५ पदाधिकाऱ्यांना मतदानापूर्वीच ६ वर्षांसाठी निलंबित केलं. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचाही यामध्ये समावेश आहे. ठाना परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपा आयात व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी दिल्याने जुन्या काँग्रेसी व्यक्तींनी नाना पटोलेंविरोधात बंडख़ोरी केली. यामुळे या पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्याची वेळ नाना पटोलेंवर आली.

    काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुकळी येथील आपल्या गावात कुटुंबासह मतदान केले असून भाजपाद्वारे जनता त्रस्त झाली असल्याने त्यांना काँग्रेस हाच एकमेव पर्याय जनतेपुढे असून जनता काँग्रेसलाच मतदान करणार असल्याच्या विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तर पक्षाच्या विरोधी कारवाई करणाऱ्या व्यक्तिंवर निलंबनाची कारवाई केल्याचे व्यक्तव नाना पटोलेंनी केलं.