फुटाळा तलावाचा होणार कायापालट; नवीन वर्षात म्युझिकल फाऊंटेन होणार सुरू

तलावात लोकांच्या मनोरंजनासाठी म्युझिकल फाऊंटेन लावले जाईल. त्याचेही काम सुरू झाले आहे. फाऊंटेनचे बेस तयार केले जात आहे. या ठिकाणी हा कारंजा अतिशय सुंदर व विविध लायटिंगने सज्ज राहणार आहे. पर्यटकांना परिसरात बसून याचा आनंद घेता येणार आहे.

  नागपूर, उपराजधानीतील सर्वात सुंदर फुटाळा तलावाच्या (nagpur futala lake) सौंदर्यीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. तथापी याला याच वर्षात 15 ऑगस्टपर्यंत सुरू करण्याची घोषणा केली होती, पण नंतर 31 डिसेंबरपर्यंत सुरू करण्याची घोषणा केली. असे वाटत नाही की निश्चित तिथीपर्यंत काम पूर्ण होईल पण गत काही दिवसात कामे वेगाने होताना दिसत आहे, परिसरातील रस्त्याच्या सिमेंटीकरणाचे काम झाले आहे.

  त्याचबरोबर तलावाच्या काठावरील व्ह्यूपॉईंटवर रस्त्यालगतची दुकाने तयार करण्यात येत असून तलावात नागरिकांना बसण्यासाठी शिडीची रचना करण्यात येत आहे. रोषनाईसाठी वीजेचे खांबही उभे केले आहे.

  रंगबिरंगी कारंज्याचे काम सुरू
  तलावात लोकांच्या मनोरंजनासाठी म्युझिकल फाऊंटेन लावले जाईल. त्याचेही काम सुरू झाले आहे. फाऊंटेनचे बेस तयार केले जात आहे. या ठिकाणी हा कारंजा अतिशय सुंदर व विविध लायटिंगने सज्ज राहणार आहे. पर्यटकांना परिसरात बसून याचा आनंद घेता येणार आहे. हा कारंजा यापूर्वीही लावला होता आणि तलावाच्या दुसऱ्या बाजूने चौपाटी केली होती. आता त्याला नव्या पद्धतीने आणि नव्या डिझाईनसह बनविण्याचे काम सुरू आहे.

  भींती तूटल्या, अपघाताचा धोका
  तलावाच्या एका बाजूने निर्माण कामे वेगाने सुरू आहे, मात्र वायुसेनानगरकडे जाणाऱ्या दिशेला तलावाच्या भिंती कोसळल्या आहेत. पण सध्या त्याचे निर्माण काम सुरू नाही केल्या गेले. या बाजूचे भिंतीचे बांधकाम एकाच वेळी सुरू करता येईल, असे नागरिकांनी सांगितले.

  एकीकडे मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे तर दुसरीकडे काहीच नाही. या बाजूने भिंत नसल्यामुळे अपघाताचा धोका बनला राहातो. दररोज सायंकाळी याच मार्गावर मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांच्या गाड्या लागतात. या गाड्यांवर तरुणाईची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तूटलेल्या भिंतीवाल्या भागात जितका भाग सुरक्षित आहे, त्यावर तरुण बसलेले दिसतात. काही भागाला टिनाने बंद केले आहे.

  कचरा-घाणीचे साम्राज्य
  स्थानिक प्रशासनांतर्फे तलावांना स्वच्छ ठेवण्याचा दावा केला जातो, पण फुटाळा परिसर आणि तलावातही मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिक कचरा तरंगताना दसतो. बेजबाबदार लोकं तलावाच्या पाण्यामध्ये डिस्पोझल ग्लास, बॉटल, पुष्पमाला आदी फेकत आहे.

  यांच्यावर आवर घालणारे कोणी नाही. मनपातर्फे याठिकाणी कचरापेट्या ठेवल्या आहे पण त्यामधून एक तर उलटी पडली आहे. लोकं तेथेच जमीनीवर कचरा पसरवतात. मनपाचा संबंधित विभाग स्वच्छता करत नाही. वायुसेनानगरच्या वळणावर असलेल्या ड्रेनेज कल्व्हर्टचे तोंड पूर्णपणे कचऱ्याने भरले आहे.