Naming ceremony of Penguins In Rani Bagh

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रालयात (राणीबाग) बुधवारी, २२ डिसेंबर रोजी दोन पेंग्विन बाळांचे बारसे होणार आहे. या बारशासाठी राणीबाग व्यवस्थापनाची लगबग सुरु आहे. महापौर किशोरी पेडणेकर या पिल्लांचे बारसा करणार असून त्यांचे नामकरणही करणार आहेत. नामकरण सोहळ्यासाठी राणीबागेत धामधूम सुरू आहे(Naming ceremony of Penguins In Rani Bagh). राणी बागेत पेंग्निन दाखल झाल्यानंतर सत्ताधा-यांवर सातत्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते आहे.

    मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणीसंग्रालयात (राणीबाग) बुधवारी, २२ डिसेंबर रोजी दोन पेंग्विन बाळांचे बारसे होणार आहे. या बारशासाठी राणीबाग व्यवस्थापनाची लगबग सुरु आहे. महापौर किशोरी पेडणेकर या पिल्लांचे बारसा करणार असून त्यांचे नामकरणही करणार आहेत. नामकरण सोहळ्यासाठी राणीबागेत धामधूम सुरू आहे(Naming ceremony of Penguins In Rani Bagh).
    राणी बागेत पेंग्निन दाखल झाल्यानंतर सत्ताधा-यांवर सातत्याने विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जाते आहे.

    पेंग्विनच्या वाढत्या देखभाल खर्चावरून शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेला भाजपसह विरोधकांकडून लक्ष्य केले जात आहे. ही बाब लक्षात घेता बारसे सोहळ्यावरून विरोधकांना पुन्हा टीकेची संधी चालून आली आहे. २६ जुलै २०१६ रोजी राणीबागेत आठ हम्बोल्ट पेंग्विनचे आगमन झाले. एका पेंग्विनचा मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी सत्ताधा-यांना फैलावर घेतले होते. त्यानंतर देखभाल खर्चावरून अधूनमधून विरोधकांकडून टीका केली जाते आहे. मात्र पेंग्विनमुळे राणीबागेत येणा-या पर्यटकांची संख्याही वाढली आहे.

    सध्या राणीबागेत तयार केलेल्या वातावरणात पेंग्विनने चांगलाच तग धरला आहे. दोन पेंग्विन माद्यांनी पिल्लांनाही जन्म दिला आहे. डेसी नावाच्या मादीने अंड दिले होते. त्यातून एक मे २०२१ मध्ये एका पिल्ल्याचा जन्म झाला. तर फ्लिपर नावाच्या मादीच्या अंड्यातून १९ ऑगस्ट २०२१ मध्ये अजून एका पिल्लाचा जन्म झाला. त्यामुळे राणीबागेतील पेंग्विनची संख्या आता नऊ झाली आहे. राणीबाग येथील प्रथा-परंपरेनुसार प्राणी-पक्षी याप्रमाणे पेंग्विन पिल्लांचे नामकरण करण्यात येणार आहे.

    राणीबागेतील हत्तींची अनारकली व लक्ष्मी तर एका गेंड्याचे शिवा हे नामकरण करण्यात आले होते. त्याप्रमाणे आता पेग्विन पिल्लांचे नामकरण करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता हा नामकरण सोहळा होणार आहे. या नामकरणासाठी पाहुणे म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. राणीबागेत अशा प्रकारचा प्रथमच महापौरांच्या उपस्थितीत असा नामकरण सोहळा होत असल्याचे सांगण्यात आले.