संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

सुरत राष्ट्रीय महामार्गावर संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. यात रविवारी सकाळी विसरवाडी गावाजवळ नंदुरबार–डहाणू बसचा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानही झाली नाही(Nandurbar-Dahanu Bus Crashed due to four-laning work).

    धुळे : सुरत राष्ट्रीय महामार्गावर संथगतीने सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे दिवसेंदिवस अपघात घडत आहे. यात रविवारी सकाळी विसरवाडी गावाजवळ नंदुरबार–डहाणू बसचा अपघात झाला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने यात कुठलीही जीवीतहानही झाली नाही(Nandurbar-Dahanu Bus Crashed due to four-laning work).

    नंदुरबारहून नवापूरच्या दिशेने येणाऱ्या बसला समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने हुलकावणी दिली. बस चालकाने प्रसंगावधान दाखवत प्रवाशांच्या जीव वाचविण्यासाठी बस रस्त्याच्या बाजूला दाबली. त्यात बस मातीत फसली. या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही. बसमधील लहान बालके व महिलांना पाच ते सहा प्रवाशांंना किरकोळ मुकामार लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

    महामार्गालगत असलेल्या खड्ड्यात बस असल्याने ट्रॅक्टरला टोचन लावून बसला बाहेर काढण्यात आले. सर्व प्रवाशांना बसवून बस रवाना करण्यात आली. धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गाचे गेल्या आठ वर्षापासून चौपदरीकरणाच्या कामात अनेक अनियमितता असल्याने नागरिकांना अपघातांना बळी पडावे लागत आहे; याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.