कोडोलीत राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा; ग्राहकांचे शंका समाधान

ग्राहकाने जागरूक राहून आवश्यक असेल तेवढेच खरेदी करून बिल घ्यावे. बाजार पेठेतील अनुचित व्यापार व खरेदी विक्रीतील त्रुटी आणि वस्तू व सेवेतील दोष आणि समस्या दूर करण्यासाठी सर्व ग्राहकांनी जागरूक राहण्याचे आवाहन बुरांडे यांनी केले.

    वारणानगर :  येथे पन्हाळा तहसिलदार कार्यालय व अखिल भारतीय ग्राहक पंचायत पन्हाळाच्या वतीने २४ डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय ग्राहक दिन पंधरवडा कोडोलीत सुयोदय हॉल येथे साजरा करण्यात आला.

    २४ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय ग्राहक हक्क कायद्याला राष्ट्रपतींची सही होऊन मंजूरी मिळाली. तेव्हापासून २४ डिसेंबर हा राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. पन्हाळा तहसिलदार कार्यालय व पन्हाळा अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक प्रबोधन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा सदस्य प्रविण बुरांडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना बुरांडे यांनी फसवणारे आपल्याला फसवण्यासाठी बसलेले आहेत.

    ग्राहकाने जागरूक राहून आवश्यक असेल तेवढेच खरेदी करून बिल घ्यावे. बाजार पेठेतील अनुचित व्यापार व खरेदी विक्रीतील त्रुटी आणि वस्तू व सेवेतील दोष आणि समस्या दूर करण्यासाठी सर्व ग्राहकांनी जागरूक राहण्याचे आवाहन बुरांडे यांनी केले.

    या कार्यक्रमाला पन्हाळाचे नायब तहसीलदार अस्लम जमादार कोडोलीचे मंडल अधिकारी अभिजित पोवार, पुरवठा अधिकारी मुकुंद लींगम, सर्होदय विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लक्षमण कुलकर्णी, अखिल भारतीय ग्राहक पंचायचे पन्हाळा अध्यक्ष दत्तात्रय धडेल, पन्हाळा संघटक नितीन पाटील, पन्हाळा तहसिल विभागातील अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.