शरद पवारांनी सांगितलं राजकारणातलं ‘ते’ गुपित; म्हणाले…

राजकारणात आता कर्तृत्त्व सिध्द करण्यासाठी सज्ज व्हा. आता हीच संधी तुम्हाला आहे पक्षाचा चेहरा बदलण्यासाठी. पक्षातील अधिकाधिक तरूण-तरूणींना संधी दिली पाहिजे. आगामी निवणुकीत तरूणांना कसे सामावून घेता येईल याबाबत पक्षातील मंडळी लवकरच निर्णय घेतील, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.

  महाबळेश्वर : आपल्या पक्षाची जी विचारधारा आहे, ती शाहू-फुले आंबेडकरांची आहे. ही विचारधारा घराघरात पोहोचवून नव्या महाराष्ट्राची उभारणी करण्याची संधी आजच्या तरूणांसमोर (Sharad Pawar in Satara) उभी आहे. आम्ही आता वयाच्या वेगळ्या वळणावर पोहोचलो आहोत. त्यामुळे नव्या नेतृत्वाची फळी उभारण्याचे आव्हान पक्षाला भविष्यात पेलावे लागणार आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महाबळेश्वर येथे काढले.

  महाबळेश्वर येथे युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोप सत्रात शरद पवार बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, अमोर कोल्हे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

  राजकारणात संधी मिळत नाही तर…

  शरद पवार म्हणाले की,  राजकारणात संधी मिळण्याची अनेकजण वाट पाहतात. परंतु राजकारणात संधी कधी मिळत नाही तर ती संधी हिसकावून घ्यावी लागते अन् संधी मिळताच खुर्चीवर ताबा मिळवावा लागतो. कारण आम्ही व्यासपीठावर जी मंडळी आहे ती खुर्ची कधी सोडत नसतो. पक्ष संघटना बांधणी करताना विकासात्मक दृष्टीकोन महत्वाचा ठरतो.

  पक्षाचा चेहरा बदलण्यासाठी तुम्हाला संधी