नीरज चोप्राने आपल्या थ्रोईंग स्किल्सला अजून मजबूत करण्यासाठी त्याने जर्मनीच्या बायो मॅकेनिक्स एक्सपर्ट क्लाऊस बार्तोनित्ज यांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती.
नीरज चोप्राने आपल्या थ्रोईंग स्किल्सला अजून मजबूत करण्यासाठी त्याने जर्मनीच्या बायो मॅकेनिक्स एक्सपर्ट क्लाऊस बार्तोनित्ज यांच्याकडून ट्रेनिंग घेतली होती.

नीरजनं 89.30 मीटर भाला फेकत रौप्य पदकाची कमाई केलीय. टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून नीरज चोप्राने यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये पतियाळा येथे 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला होता.

    ऑलिम्पिकमध्ये सुवर्णकामगिरी करणाऱ्या भारताच्या भालाफेकपटू निरज चोप्राने पुन्हा एक विक्रम आपल्या नावे केला आहे. फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ (Paavo Nurmi Games 2022) मध्ये नीरजने ८९.३० मीटर दूर भालाफेक करत स्वत:चाच विक्रम मोडलाय. यापुर्वी निरजने ऑलिम्पिकमध्ये ८७. ५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.

    ७ ऑगस्ट २०२१ रोजी त्याने टोक्यो येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये भालाफेकपटू निरजने सुवर्णपदकाची कमाई केली होती. या कामगिरीमुळे तो अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक पटकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. आता फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ (Paavo Nurmi Games 2022) मध्ये नीरजने ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केलाय. फिनलॅण्डच्या ऑलिव्हर हीलॅण्डरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्याने ८९.८३ मीटरपर्यंत भाला फेकत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं. तर, नीरजनं 89.30 मीटर भाला फेकत
    रौप्य पदकाची कमाई केलीय. टोक्यो ऑलिम्पिकनंतर नीरजची ही पहिलीच स्पर्धा असून नीरज चोप्राने यापूर्वी गेल्या वर्षी मार्चमध्ये पतियाळा येथे 88.07 मीटरचा राष्ट्रीय विक्रम केला होता.