Neither Maharashtra, nor Kerala, nor Karnataka, nor Tamil Nadu ... the teeth of the people of Gujarat are very strong

देशात गुजरातमधील लोकांचे दात सर्वात जास्त मजबूत असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील लोकांपेक्षाही गुजरातमधील लोकांचे दात अत्यंत मजबूत असल्याचे आढळून आले आहे(Neither Maharashtra, nor Kerala, nor Karnataka, nor Tamil Nadu ... the teeth of the people of Gujarat are very strong).

  अहमदाबाद : देशात गुजरातमधील लोकांचे दात सर्वात जास्त मजबूत असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील लोकांपेक्षाही गुजरातमधील लोकांचे दात अत्यंत मजबूत असल्याचे आढळून आले आहे(Neither Maharashtra, nor Kerala, nor Karnataka, nor Tamil Nadu … the teeth of the people of Gujarat are very strong).

  कॅल्शियमचे प्रमाण जास्त

  गुजरातच्या फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीने (जीएफएसयू) केलेल्या एका अभ्यासातून ही बाब समोर आली आहे. केरळ, कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील लोकांच्या दातांमध्ये कॅल्शियमचे जेवढे प्रमाण असते, त्यापेक्षा अधिक कॅल्शियमचे प्रमाण गुजराती लोकांच्या दातांमध्ये असल्याचे आढळून आले आहे. गुजरात आणि केरळमधील लोकांच्या दातांवर डाएटचा काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यात आला. त्

  यावेळी गुजरातमधील लोकांच्या दातांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण 82 टक्के असल्याचे आढळून आले. तर केरळमधील लोकांच्या दातांमध्ये 80 टक्के कॅल्शियमचे प्रमाण आढळून आले. दातांमधील कॅल्शियमच्या प्रमाणात दोन टक्क्यांनी फरक असला तरी दातांच्या संरचनेत फरक पडतो, असे जीएफएसयूचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेश बाबू यांनी सांगितले. राजेश बाबू यांनी विद्यापीठातील विद्यार्थी डॉ. अभिनव राज यांच्यासोबत हा अभ्यास केला आहे.

  असे आहे प्रमाण

  शाकाहारी आहार घेत असल्यामुळे गुजरातील लोकांच्या दातांमध्ये झिंक आणि फॉस्फरसचे प्रमाण क्रमश: 0.14 टक्के आणि 17.3 टक्के आढळून आले आहे. हे प्रमाण मांस, मासे आणि इतर मांसाहारी पदार्थांपेक्षा कमी आहे. तर केरळमधील लोकांच्या दातांमध्ये झिंक आणि फॉस्फरसचे प्रमाण 0.23 टक्के आणि 18.5 टक्के एवढे असल्याचेही या अभ्यासातून दिसून आले आहे.

  स्ट्रॉन्शियमचेही प्रमाण अधिक

  गुजराती लोकांच्या दातांमध्ये स्ट्रॉन्शियमचे प्रमाणही अधिक आढळून आले आहे. त्यातून गुजराती लोकांच्या दातांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण मल्याळी लोकांपेक्षा अधिक आहे. मात्र, त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज असल्याचे राजेश बाबू यांनी सांगितले. दरम्यान, दुग्ध उत्पादनात टॉपला असलेल्या पंजाब आणि हरयाणातील आकडेही गुजरातमधील आकड्यांच्या आसपास असावेत असे सांगितले जात आहे.