गेल्या २४ तासात देशात नवीन १२ हजार २४९ कोरोना बाधितांची नोंद! १३ जणांचा मृत्यू

मंगळवारी दिवसभरात ९ हजार ८६२ कोरोनाबाधितांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण सामान्य आहे. पॅझिटीव्हिटीस रेट ३. ९४ टक्के आहे.

    देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या २४ तासात १२ हजार २४९ नवीन कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर, गेल्या २४ तासात १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात दिल्लीसह महाराष्ट्रात रूग्णवाढ होताना दिसत आहे. दिवसागणिक होणारी ही वाढ यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी आहे.

    कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत थोड्या प्रमाणात घट झाली आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालेली असताना रुग्णसंख्येत झालेली ही मोठी घट एक दिलासादायक बातमी आहे. मंगळवारी दिवसभरात ९ हजार ८६२ कोरोनाबाधितांनी यशस्वीरित्या कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याच प्रमाण सामान्य आहे. पॅझिटीव्हिटीस रेट ३. ९४ टक्के आहे.