२०२४ पर्यंत नव्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता नाहीच !

देशात २०२२ पर्यंत एकाही नवीन अभियात्रिकी महाविद्यालयांना मान्यता न देण्याचा निर्णय परिषदेने यापूर्वीच घेतला होता. आता हा निर्णय पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवण्याचा सल्ला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या तज्ज्ञ समितीने दिला आहे.

    पुणे: देशात २०२२ पर्यंत एकाही नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयांना मान्यता न देण्याचा निर्णय परिषदेने यापूर्वीच घेतला होता. आता हा निर्णय पुढील दोन वर्षांसाठी कायम ठेवण्याचा सल्ला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या (Indian Council of Technical Education) तज्ज्ञ समितीने दिला आहे. यामुळे २०२४ पर्यंत देशभरात एकाही नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता मिळणार नसल्याचे समितीकडून सांगण्यात आले.अभियांत्रिकी अभ्यासक्रमांसाठीच्या जागा आणि विद्यार्थी संख्या यांच्या प्रमाणात खूप तफावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे यावर निर्णय होण्याची शक्यता असल्याचे परिषदेचे अध्यक्ष डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले आहे.

    नवीन महाविद्यालयाला मान्यता न देण्याचा निर्णय तसेच त्यानंतर मागणी नसलेल्या अभ्यासक्रमांना एकही जागा वाढून न देण्याचा निर्णयामुळे रिक्त राहणाऱ्या जागांचे प्रमाण हे ५० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. यामुळे इंजिनीअर्सची रोजगारक्षमता वाढण्यास मदत होत असल्याचेही सहस्रबुद्धे यांनी स्पष्ट केले.