ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नाताळनिमित्त नवीन नियमावली जारी; जाणून घ्या…

पिंपरी-चिंचवड शहरावर ‘ओमायक्रॉन’चे (Omicron Virus) मोठे संकट आले आहे. गुरुवारी शहरात एकाचदिवशी नवीन सात रुग्णांची भर पडली असून, शहरातील रुग्णसंख्या १९ वर पोहोचली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) असलेल्या नाताळनिमित्त आयुक्त राजेश पाटील यांनी नियमावली जारी (New Guideline Issued for Christmas) केली आहे.

  पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरावर ‘ओमायक्रॉन’चे (Omicron Virus) मोठे संकट आले आहे. गुरुवारी शहरात एकाचदिवशी नवीन सात रुग्णांची भर पडली असून, शहरातील रुग्णसंख्या १९ वर पोहोचली आहे. त्यापार्श्वभूमीवर उद्या (शनिवारी) असलेल्या नाताळनिमित्त आयुक्त राजेश पाटील यांनी नियमावली जारी (New Guideline Issued for Christmas) केली आहे.

  नाताळनिमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या ५० टक्केपर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. सुरक्षित अंतराचे पालन करावे. धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणुकांचे आयोजन करू नये, असे आदेश त्यांनी काढले आहेत.

  कोरोनाचा नवीन विषाणू असलेल्या ‘ओमायक्रॉन’चा संसर्ग झालेल्या रुग्णांची शहरात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. नाताळ सणानिमित्त ख्रिस्ती बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता यावर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पद्धतीने साजरा करावा.

  कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये ‘ओमायक्रॉन’ ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन धोका निर्माण झाला आहे. या ‘ओमायक्रॉन’चे संक्रमण सामान्यांमध्ये फार मोठ्या तीव्रतेने पसरण्याची दाट शक्यता आहे.

  आसनक्षमतेच्या ५० टक्क्यांपर्यंत उपस्थितीला परवानगी

  नाताळनिमित्ताने चर्चमध्ये उपलब्ध आसनक्षमतेच्या 50 टक्के पर्यंत लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असेल. चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व सामाजिक अंतर राखले जाईल. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी.

  सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे

  नाताळच्या दिवशी चर्चमध्ये प्रभू येशूच्या जीवनावरील देखावे. ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवल्या जातात. त्या ठिकाणी सामाजिक अंतर व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी कमीत-कमी गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करून सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे.

  मिरवणुकांचे आयोजन करू नये

  चर्चच्या बाहेर/परिसरात दुकाने अगर स्टॉल लावू नयेत. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक/सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये. फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये, ध्वनीप्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटकोर पालन करण्यात यावे.