jio कडून लॉन्च करण्यात आला नवीन प्लॅन; Netflix – Amazon सह सर्वकाही मोफत

OTT ॲप्सच्या स्ट्रीमिंगसोबतच एका प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा उपलब्ध होणार आहे.प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा देण्यात आला आहे.

    जिओ कडून सर्वसामान्य नागरिकांसाठी दरवेळी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. तसेच आता जिओ कडून पुन्हा एकदा नवीन योजना लॉन्च करण्यात आली आहे. नवीन लॉन्च करण्यात आलेल्या प्लॅनमध्ये Amazon Prime Video आणि Netflix सर्व काही मोफत दिसणार आहे. हा मासिक प्लॅन ८८८ रुपयांचा असेल. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांसाठी JioFiber आणि Jio AirFiber या दोन्ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ट्सॲपवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल्स करायला जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यासाठी कोणताही वेगळा रिचार्ज करण्याची गरज नाही. जिओच्या नवीन प्लॅनमध्ये या सर्व सेवा देण्यात आल्या आहेत.

    जिओने ग्राहकांना दिलेल्या नवीन प्लॅनमध्ये अनेक सेवा मोफत देण्यात आल्या आहेत. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 Mbps च्या स्पीडने अमर्यादित डेटा देण्यात आला आहे. तसेच Netflix Basic Plan, Amazon Prime आणि JioCinema Premium सारख्या 15 पेक्षा जास्त OTT चे मोफत सबस्क्रिप्शन ऑफर करण्यात आले आहे. OTT ॲप्सच्या स्ट्रीमिंगसोबतच एका प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जर तुम्ही हा प्रीपेड प्लॅन वापरत असाल तर तुम्हाला वेगवेगळे रिचार्ज करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

    कंपनीच्या सांगण्यानुसार, सर्व विद्यमान वापरकर्ते नवीन पोस्टपेड प्लॅनमध्ये सहजपणे अपग्रेड करू शकतात. या प्लॅनमध्ये तुम्हाला व्हॉईस कॉलिंग आणि मेसेजिंगची सुविधा मिळणार नाही. जिओ आयपीएल धन धना धन ऑफरवर हा प्लॅन लागू होणार आहे. ते JioFiber असो किंवा AirFiber ग्राहकांना त्यांच्या Jio होम ब्रॉडबँड कनेक्शनवर 50 दिवसांचे डिस्काउंट क्रेडिट व्हाउचर मिळू शकेल. जिओ आयपीएल धन धना धन ऑफर 31 मे 2024 पर्यंत लागू आहे. ही Jio DVD ऑफर खास T20 सीझनसाठी तयार करण्यात आली आहे, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.