मलनिस्सारण वाहिनीत नवजात अर्भक सापडले मृतावस्थेत

महंमदवाडी भागातील राजीव गांधी कॉलनी परिसरात महापालिकेकडून मौलापाणी पाईप लाईनचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी येथे काम करणाऱ्यांना नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.

    पुणे : हडपसर परिसरात मौलापाणी पाईपलाईनमध्ये नवजात अर्भक मृतावस्थेत सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.याप्रकरणी सहाय्यक फौजदार मुनीस इनामदार यांनी वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.

    महंमदवाडी भागातील राजीव गांधी कॉलनी परिसरात महापालिकेकडून मौलापाणी पाईप लाईनचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी दुपारी येथे काम करणाऱ्यांना नवजात अर्भक मृतावस्थेत सापडले. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. नवजात अर्भकाच्या पालकत्वाची जबाबदारी न स्विकारता त्याला मृतावस्थेत सोडून देणाऱ्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तप्रसाद शेंडगे तपास करत आहे.