ना कोणती डिग्री ना कोणतं सर्टिफिकेट; महापालिकेने लाखो लोकांच्या आरोग्याची जबाबदारी सोपवली बोगस डॉक्टरवर

महापालिकेने लाखो लोकांच्या आरोग्याची जबाबदारी दिलेला डॉक्टरच बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुनील वाडकर असे या डॉक्टरचे नाव असून त्याला विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत(No degree or certificate; Municipal Corporation entrusts responsibility for health of millions of people to bogus doctors).

    वसई : महापालिकेने लाखो लोकांच्या आरोग्याची जबाबदारी दिलेला डॉक्टरच बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. सुनील वाडकर असे या डॉक्टरचे नाव असून त्याला विरार पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत(No degree or certificate; Municipal Corporation entrusts responsibility for health of millions of people to bogus doctors).

    बोगस पदवी धारण करून रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉ. सुनिल वाडकर याला विरार पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल आहे. त्याच्या विरोधात याआधी विरार पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हादेखील दाखल असल्याचे समजते. लिव्ह इन रिलेशनशिपमधील प्रेयसीला मारहाण करून विनयभंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    डॉ. सुनिल वाडकर हा प्रेयसीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. त्याचे व प्रेयसीमध्ये नेहमीच वाद उफाळून येत होते. त्यातून डॉ. वाडकर याने पीडित महिलेला विरार फाटा येथील हायवे रुग्णालयातच मारहाण केली होती, असे काही खात्रीलायक सुत्रांकडून समजते. यावेळी डॉक्टरने प्रेयसीला खाली पाडून लाथा बुक्यांनी मारहाण केली. तसेच शिवीगाळ केली, अशी तक्रार महिलेने दिल्यानंतर विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सुनील वाडकर यांना गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसायासाठी अधिकृत पदवी प्रमाणपत्र नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस अधिनियम १९६१ चे कलम ३३ तसेच भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४१९, ४२० अन्वये विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    डॉ. सुनील वाडकर हे वसई विरार महापालिकेचे माजी वैद्यकीय अधिकारी होते. सध्या ते विरार महामार्गावर ‘हायवे’ आणि नालासोपारा येथे ‘नोबेल’ अशी दोन खासगी रुग्णालये चालवतात. त्यांची वैद्यकीय पदवी बोगस असल्याची तक्रार गुन्हे शाखेकडे आली होती. त्यानुसार सोमवारी रात्री अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेच्या पथकाने कारवाई केली.