अनुदानाअभावी कोणतीही शाळा बंद केली जाणार नाही; वर्षा गायकवाड यांची ग्वाही

त्रुटीपूर्तता आणि अनुदानाअभावी राज्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विधानपरिषदेत दिली. काही कागदपत्रांअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये टाकण्यात आल्या आहेत.

    मुंबई : त्रुटीपूर्तता आणि अनुदानाअभावी राज्यातील कोणतीही शाळा बंद होणार नाही, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विधानपरिषदेत दिली. काही कागदपत्रांअभावी अनेक शाळा त्रुटीमध्ये टाकण्यात आल्या आहेत. मात्र, विनाकारण त्रुटी  दाखवल्याने शिक्षकांना नाहक विनावेतनाचा त्रास सहन करावा लागत आहे, असे सांगत काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

    खर्च करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही

    या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गायकवाड म्हणाल्या की, त्रुटीपूर्तता केलेल्या शाळांना अनुदान देण्याबाबत खर्च करण्यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. याबाबत वित्त विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल, असेही त्या म्हणाल्या.