योगी नाही मोदींच्या चेहऱ्यावर भाजपा करणार प्रचार, ११ आमदारांच्या राजीनामा सत्रानंतर निर्णय

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक नेत्यांनी ओबीसी, दलितांची मते पक्षाला मिळवून दिली होती. त्यामुळे उ. प्रदेशात भाजपाच्या मतांची ट्ककेवारी ही ४० टक्क्यांहून अधिक झाली होती. आता या समीकरणाला छेद देण्याचा प्रयत्न समाजवादी पार्टीकडून होताना दिसतो आहे. छोट्या पक्षांसह आघाड्या करुन अखिलेश यादव ही निवडणूक लढवीत आहेत, तसेच भाजपाचे काही आमदार त्यांच्या पक्षात गेल्याने सपाच्या कार्यकर्त्यांचा विश्वासही दुणावला आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्यावर ते भेदभाव करत असल्याचा आरोपही करण्यात येतो आहे. पक्ष सोडलेले मंत्री स्वामी प्रसाद यादव यांनी, योगी यांच्यासमोर कनिष्ठ जातीतील नेते, अगदी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हेही स्टूलवर बसत होते, असा आरोप केला आहे.

  लखनौ – उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे राज्यातील सर्वात मोठे भाजपाचे नेते असल्याचे आत्ताआत्तापर्यंत सांगण्यात येत होते. त्यांना असलेला जनतेचा पाठिंबा पाहता, भगव्या पार्टीत नरेंद्र मोदी यांना आव्हान म्हणून येत्या काही काळात त्यांचा उल्लेख होईल, असेही सांगण्यात येत होते. हिंदुत्वाचा चेहरा असेच योगी आदित्यनाथ यांना पक्षातूनही प्रोजेक्ट केले जात होते. धर्माच्या आधारावर कोणत्याही मतदरासंघात आणि राज्यातही योगी सहजपणे मते खेचून आणू शकतील, असा विश्वासही सर्व भाजपा नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही होता. मात्र गेल्या आठवडाभरात ही समीकरणे बिघडली आहेत. गेल्या ठवडाभरात तीन मंत्र्यांसह ११ आमदारांनी भाजपाला रामराम करुन समाजवादी पार्टीत जाणे पसंत केले आहे.

  यामुळे आता योगी आदित्यनाथ यांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढविण्याच्या भाजपाच्या रणनीतीला सेटबॅक बसला आहे. ओबीसी, दलित आणि ब्राह्मण यांच्यावर अन्याय होत असल्याची भावना सोडणाऱ्या आमदारांनी त्यांच्या राजीनाम्याच्या पत्रातही दिल्याने, योगींचे नेतृत्व अचानक थोडे वादात सापडले आहे. यात अजून काही आमदारांचे राजीनामे येत्या काही दिवसांत पडतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  सपाचे आव्हान

  २०१७ च्या निवडणुकीत भाजपाच्या विजयासाठी प्रयत्नशील असलेल्या अनेक नेत्यांनी ओबीसी, दलितांची मते पक्षाला मिळवून दिली होती. त्यामुळे उ. प्रदेशात भाजपाच्या मतांची ट्ककेवारी ही ४० टक्क्यांहून अधिक झाली होती. आता या समीकरणाला छेद देण्याचा प्रयत्न समाजवादी पार्टीकडून होताना दिसतो आहे. छोट्या पक्षांसह आघाड्या करुन अखिलेश यादव ही निवडणूक लढवीत आहेत, तसेच भाजपाचे काही आमदार त्यांच्या पक्षात गेल्याने सपाच्या कार्यकर्त्यांचा विश्वासही दुणावला आहे. तसेच योगी आदित्यनाथ यांच्यावर ते भेदभाव करत असल्याचा आरोपही करण्यात येतो आहे. पक्ष सोडलेले मंत्री स्वामी प्रसाद यादव यांनी, योगी यांच्यासमोर कनिष्ठ जातीतील नेते, अगदी उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य हेही स्टूलवर बसत होते, असा आरोप केला आहे.

  या एकूण घडामोडी आणि आरोपांनंतर , योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिमेला धक्का बसला असून, ते एकट्याच्या जीवावर भाजपाला उ. प्रदेशात यश मिळवून देऊ शकतील का, याबाबत साशंकता व्यक्त होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर विश्वास असलेले भाजपाचे नेते आणि कार्यकर्तेही संभ्रमात असल्याचे दिसते आहे.

  रणनीतीत बदल

  आगामी दोन महिने सर्वच पक्षांसाठी परीक्षेचे सले, तरी भाजपासाठी ही परीक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे येत्या प्रचारात भाजपाला आपल्या रणनीतीत बदल करणे गरेजेचे वाटू लागले आहे. भाजपाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार योगी आदित्यनाथ यांच्याऐवजी भआजपा आता राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर मते मागण्याची शक्यता आहे.

  सद्यस्थिती पाहता, योगी हा सामना एकट्याने लढू शकणार नाहीत, त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांनी उ. प्रदेशातील प्रचाराची धुरा स्वताकडे घेण्याची गरज असल्याचे एका वरिष्ठ भाजपा नेत्याचे म्हणणे आहे.

  येत्या एक दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उ. प्रदेशातील सभा वाढण्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. सपा आणि भाजपा यांच्यात राज्यात अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, भाजपाला यश मिळवायचे असेल तर नरेंद्र मोदींवर ही धुरा असणार असल्याचे संकेत कार्यकर्त्यांतडून मिळत आहेत.

  या धक्क्यात असलेले योगी आदित्यनाथही सध्या बॅकफूटवर आहेत. इतर वेळी जहाल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या योगींनी शुक्रवारी गोरखपूरमध्ये सोडून गेलेल्या नेत्यांची नावे घेण्याचेही टाळले. घराणेशाहीच्या राजकारणावर विश्वास ठेवणारे मागासवर्गीय आणि दलितांचे हितचिंतक असू शकत नाही, इतकेच ते म्हमाले. तसेच सरकारने केलेल्या कामांची यादीच त्यांनी यावेळी वाचून दाखवली.