सतेज पाटील, अमल महाडिक यांच्या अर्जांची छाननी; दोघांचेही अर्ज…

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Elections) आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार सतेज पाटील (Satej Patil) व अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले.

    कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी (Legislative Council Elections) आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार सतेज पाटील (Satej Patil) व अमल महाडिक (Amal Mahadik) यांच्या अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये दोन्ही अर्ज वैध ठरवण्यात आले. हे अर्ज वैध ठरल्यानंतर समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जोरदार घोषणाबाजी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
    कोल्हापूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारांची छाननी होणार असल्याने सकाळपासूनच समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सदरचे अर्ज वैध ठरवण्यात आले. त्यानंतर समर्थकांनी विजयाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून जिल्हाधिकारी कार्यालयातून समर्थकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
    विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी असल्याने विजय होण्याची खात्री दोन्ही उमेदवारांना आहे. तर जमावबंदी आदेश असतानासुद्धा समर्थकांनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात गर्दी केली होती.
    यावेळी ‘सतेज पाटील साहेबांचा विजय असो, तर विरोधी गटाकडून अमल महाडिक साहेबांचा विजय असो’, ‘अरे कोण म्हणते येत नाही, आल्याशिवाय राहत नाही, काय पण होऊ द्या, एकदा जिरवायची’, अशा घोषणा प्रतीघोषणा देण्यात येत होत्या. त्यामुळे संपूर्ण परिसर घोषणाबाजीने दणाणून गेला होता. सदरच्या घोषणाबाजीमुळे उमेदवार यांच्यात समर्थकांमध्ये राडा होतो का काय अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करत संपूर्ण वातावरण शांत केले.