‘या’ तारखेनंतर लस न घेणाऱ्यांना फिरू देणार नाही; औरंगाबाद मनपाचा निर्णय

३० नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यानंतर ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांना दुकान, मॉल, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे प्रवेश मिळणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही. कोणत्याही सुविधा तसेच सर्व ठिकाणी व कोणत्याही कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

    औरंगाबाद : शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट येत्या ३० नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबर पर्यंत नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे अन्यथा त्यानंतर ज्या नागरिकांनी लस घेतली नाही त्यांना दुकान, मॉल, हॉटेल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानक येथे प्रवेश मिळणार नाही. तसेच पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही. कोणत्याही सुविधा तसेच सर्व ठिकाणी व कोणत्याही कार्यालयात प्रवेश मिळणार नाही. असा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. अशी माहिती महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

    कोविड लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने ऐतिहासिक बीवीका मकबरा येथे ६ नोव्हेंबर पासून टेस्टिंग सेंटर सुरु करण्यात आली आहे. ६ नोव्हेंबरला ८१५, ७ नोव्हेंबरला १०३३, ८ नोव्हेंबरला ९५८, ९ नोव्हेंबरला रोजी ७३३ असे एकूण ३५३९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच ९ नोव्हेंबरपासून बिबीका मकबरा येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे.

    तसेच शहरातील सर्व लोकप्रतिनिधी विविध आस्थापनांचे प्रमुख तसेच व्यापारी महासंघ यांना आयुक्तांच्या स्वाक्षरीचे पत्र देऊन लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे कळविण्यात आले आहे. दस्तक हर घर या मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तीन नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कमी लसीकरण झालेल्या प्रत्येक सहा केंद्रनिहाय दोन अधिकारी अशी एकूण चार मेडिकल अधिकारी यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहे. ८ नोव्हेंबर आरोग्य वैद्यकीय अधिकारी यांना सर्व अधिकारी यांची बैठक घेतली या बैठकीत सर्व आरोग्य केंद्र अंतर्गत वैद्यकीय अधिकारी यांनी धर्मगुरू, खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांच्या बैठका घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत.