नोरा फतेही ‘या’ कारणामुळे सोशल मिडियावर होतेय ट्रोल!

नोराने डान्स करताना नोराने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत 'जय हिंद'च्या घोषणा दिल्या. मात्र यावेळी तिने राष्ट्रध्वज उलटा पडकल्याने तिच्यावर आता टिका करण्यात येत आहे.

  नोरा फतेहीच्या (Nora Fatehi) डान्सचे आणि तिच्या फिगरचे जगभरात चाहते आहेत. ती नेहमीच तिच्या डान्समुळे आणि फोटोमुळे सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरते. यावेळीही नोरा चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिला ट्रोल केल्या जात आहे. याच कारण म्हणजे ‘फिफा विश्वचषक 2022’मध्ये (FIFA World Cup 2022) भारताचं प्रतिनिधित्व करताना तिने राष्ट्रध्वज उलटा पकडला. त्यामुळे आता तिला ट्रोलींगला सामोरं जाव लागत आहे. यामुळे नोराच्या अडचणीत वाढ होऊ शकतो.

  सध्या कतारमध्ये ‘फिफा विश्वचषक 2022’ सुरु आहे. नोरा फतेहीने कतारमध्ये विश्वचषक दरम्यान एक गाणं सादर केलं.  त्यादरम्यान तिचा स्टेजवर डान्स करतानाचा व्हिडीओही समोर आला. मात्र, आता समोर आलेल्या व्हिडीओवरुन तिला ट्रोल केलं जात आहे. डान्स करताना नोराने भारताचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवत ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. मात्र यावेळी तिने  राष्ट्रध्वज उलटा पडकल्याने तिच्यावर आता टिका करण्यात येत आहे.

   

  View this post on Instagram

   

  A post shared by Arshin k madhu (@arshin_k_madhu)