आता धान उत्पादक सापडले संकटात; पिकावर खोडकिडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव

जिल्ह्यात एकीकडे सोयाबीन पिके (Soybean Crop) रोगाच्या प्रादुर्भावाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाच आता नागभीड तालुक्यातील तळोधी बा. मंडळ परिसरात धान पिकावर खोड किडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

    लातूर : जिल्ह्यात एकीकडे सोयाबीन पिके (Soybean Crop) रोगाच्या प्रादुर्भावाने नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. असे असतानाच आता नागभीड तालुक्यातील तळोधी बा. मंडळ परिसरात धान पिकावर खोड किडा, करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

    निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दगा दिला तर आता पीक हाती येण्याच्या स्थितीत असलेल्या धान पिकावर मावा-तुडतुडा, करपा, खोड किडा, लाल्या रोगाने आक्रमण केल्याने उभ्या धान पिकाची तस होत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा हतबल झाला आहे. महागड्या

    कीटकनाशकांची फवारणी करूनही करपा व तुडतुडा नियंत्रणात न आल्याने पिके सुकल्यासारखी दिसत आहेत. धानपीक उत्पादन एकरी खर्च 20-25 हजार रुपये इतके आहे. यात धानाचे बियाणे, रोवणी, निंदन, ट्रॅक्टर, रासायनिक खते, औषधी फवारणी आणि कापणीला लागणार खर्चाचा समावेश आहे.

    करपा व तुडतुडा रोगामुळे धान पिकाचे उत्पादन घटणार असल्याने कर्जाची परतफेड कशी करावी ? कुटुंबाचा वर्षभरात खर्च कसा सोसायचा ? असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना पडला आहे. राज्य सरकाने कृषी विभागाच्या आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पिकाचे सर्वेक्षण करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.