आता मोबाईल ऍपवर मिळणार रेल्वे तिकीटाची सुविधा; जाणून घ्या बदल नेमका काय?

रेल्वेने मोबाईल अॅपवर यूटीएसमध्ये एक मोठा बदल केला आहे, ज्याद्वारे आता कोणत्याही ठिकाणाहून तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वेने सामान्य वर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल अॅपवरील यूटीएसमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत.

    जयपूर : रेल्वेने मोबाईल अॅपवर यूटीएसमध्ये एक मोठा बदल केला आहे, ज्याद्वारे आता कोणत्याही ठिकाणाहून तिकीट बुक करता येणार आहे. रेल्वेने सामान्य वर्गात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुलभ तिकीट सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोबाईल अॅपवरील यूटीएसमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. या अंतर्गत, या अॅपद्वारे तिकीट बुक करण्याची अंतर मर्यादा काढून टाकण्यात आली आहे, ज्यामुळे आता कोणत्याही ठिकाणाहून सामान्य तिकीट बुक करता येणार आहे.

    प्रवासी यूटीएस (अनारक्षित तिकीट प्रणाली) मोबाईल अॅपद्वारे अनारक्षित तिकीट बुक करू शकतात. आता अॅपमध्ये सामान्य तिकीट बुक करण्याची अंतर मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. ही सुविधा सुरू झाल्याने आता प्रवाशांना कोणत्याही ठिकाणाहून सामान्य तिकीट बुक करता येणार आहे. मोबाईल अॅपवर UTS द्वारे सामान्य तिकीट बुक करण्यासाठी यापूर्वी कमाल अंतर मर्यादा 20 किलोमीटर होती, म्हणजेच स्टेशन प्लॅटफॉर्मपासून अंतर 20 किलोमीटरपेक्षा जास्त असल्यास कोणताही प्रवासी तिकीट बुक करू शकत नव्हता.

    आता अंतराची मर्यादा हटवल्याने सर्वसाधारण तिकीट ऑनलाईन कुठूनही बुक करता येणार आहे. तथापि, अॅपमध्ये जिओ फेसिंगच्या किमान अंतरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, ज्या अंतर्गत प्रवासी प्लॅटफॉर्मवरून आणि ट्रेनच्या आत सामान्य तिकीट ऑनलाइन बुक करू शकत नाहीत.