
मागील काही महिन्यांपासून मुंबईतील काेराेनाची आकडेवारीत चढ-उतार दिसून येत आहे, यािशवाय काेराेना मृत्यु संख्येतही घट आहे, शिवाय काेराेना अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही तुरळक आहे. तर दुसरीकडे, काेराेनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा आराेग्य यंत्रणेला अॅलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
मुंबई: राज्यात काेविडचे प्रमाण कमी हाेत असून मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात नवीन रुग्णसंख्या ३० टक्क्यांनी कमी झाली असल्याची माहिती राज्य आराेग्य विभागाने बुधवारी घेतलेल्या एका विशेष बैठकीत दिली आहे. तसेच प्रयाेगशाळा पाॅिझटिव्हीटी दर ०.२९ टक्के एवढा कमी झालेला आहे व राज्यातील अकाेला, पुणे, अहमदनगर आणि जळगाव या जिल्ह्यांचा हा दर १ पेक्षा अधिक असल्याची माहिती विशेष बैठकीत देण्यात आली. राज्यात मागील आठवड्यात १६ काेविड रुग्ण रुग्णालयात भरती झाले. त्यापैकी ८ रुग्णांना आयसीयु भरतीची गरज लागलेली आहे. राज्यात आज
१३५ अक्टिव्ह रुग्ण असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
एकीकडे, काेविड संदर्भात जीन, जपान, अमेरिका व कोरिया आदी देशांमध्ये रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ हाेताना दिसत असताना, याच पार्श्वभूमीवर आराेग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व जिल्हा आराेग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, आराेग्य अधिकारी मनपा व राज्यातील सर्व आराेग्य अधिकाऱ्यांची बुधवारी विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी सार्वजनिक आराेग्य विभागाचे सचिव संजय खंदारे, आराेग्य सेवा संचालक डाॅ. साधना तायडे या देखील उपस्थित हाेते. राज्यात काेविडचे प्रमाण कमी हाेत असून असे सांगत, यावेळी डाॅ. नितीन आंबाडेकर यांनी काेविड संदर्भातील जागतिक, देशपातळीवरील व राज्यस्तरीय परिस्थिती विशद केली.
या बैठकीत करण्यात आलेल्या महत्वाच्या सूचना
- सर्व जिल्ह्यांनी टेस्ट-ट्रॅक-ट्रीट-वॅक्सिनेट व काेविड अनुरुप वर्तन या पंचसूत्रीचा वापर करावा
- प्रत्येक जिल्हा /मनपाने टेस्टींग वाढवावेल टेस्ट मधील आरटी पीसीआर चे प्रमाण वाढवावे.
- प्रत्येक आ टीपीसीआर बाधित नमुना जनुकीय क्रमनिर्धारणासाठी पाठवावा. याकरीता राज्यात ७ प्रयाेगशाळा कार्यरत आहेत.
- प्रत्येक जिल्ह्यात जुनकीय क्रमनिर्धारणासाठी नाेडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन जनुकीय क्रमनिर्धारण अधिक वेगाने हाेईल याची खातरजमा करावा.
- प्रिकाॅशन डाेसकडे अधिक लस देण्याचे आदेश.
- सध्याच्या आंतराराष्ट्रीय परिस्थितीत भारत सरकारच्या समन्वयाने आंतराराशष्ट्रीय प्रवाशांच्या स्क्रीनिंगबाबत याेग्य निर्णय घेण्यात येईल.
मुंबईतील अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑलर्ट राहण्याच्या सूचना
मागील काही महिन्यांपासून मुंबईतील काेराेनाची आकडेवारीत चढ-उतार दिसून येत आहे, यािशवाय काेराेना मृत्यु संख्येतही घट आहे, शिवाय काेराेना अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही तुरळक आहे. तर दुसरीकडे, काेराेनाच्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा आराेग्य यंत्रणेला अॅलर्ट राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. याशिवाय मागील सहा महिन्यातील मुंबईतील काेराेना रुग्ण संख्येची माहिती तसेच किती रुग्ण उपचार घेत आहेत, किती रुग्णांना घरी साेडण्यात आले आहे अशी इत्यंभूत माहितीचे संकलन करण्यात यावे, असे आदेश रुग्णालयातील अधिष्ठाता व वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. भविष्यात काेराेना नियमांचे पालनही केले जाणार असल्याची माहिती एका वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याने दिली आहे.