अंधेरी येथील वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी दोघांना अटक; डी. एन. नगर पोलिसांची कारवाई

अंधेरी येथे राहणाऱ्या गुलाबी नारायण शेट्टी या ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी (Old Age Woman Murder) दोन संशयित आरोपींना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे.

    मुंबई : अंधेरी येथे राहणाऱ्या गुलाबी नारायण शेट्टी या ७५ वर्षांच्या वृद्ध महिलेच्या हत्येप्रकरणी (Old Age Woman Murder) दोन संशयित आरोपींना डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली आहे. रशेदुल जोहाद शेख आणि नूरअली अब्दुल सत्तार अशी या दोघांची नावे असून, ते दोघेही वांद्रे येथील शास्त्रीनगरचे रहिवासी आहेत.

    अटकेनंतर या दोघांनाही वांद्रे येथील न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोघांच्या अटकेला वरिष्ठ पोलिस निरीक्षक परमेश्वर चौकशी सुरू असल्याने अधिक तपशील सांगण्यास नकार दिला.

    अंधेरीतील वालिया कॉलेजसमोरील गणेश मंदिराच्या वरच्या मजल्यावर गुलाबी शेट्टी ही वयोवृद्ध महिला एकाकी जीवन जगत होती. तिचा पती नारायण शेट्टी यांचा दारूचा व्यवसाय होता. त्यांची १९७५ मध्ये त्यांची हत्या झाली होती. गुलाबी यांना एक विवाहित मुलगी असून, ती अंधेरीतील चार बंगला परिसरात राहते.