देशात ओमायक्रॉनचा राडा; रुग्णसंख्या ८७ वर

जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेही डोकं वर काढलं आहे. तर आता भारतातही ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत भर पडत होत आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८७ वर पोहोचला आहे.

    मुंबई  : जगात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना आता जगात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनेही डोकं वर काढलं आहे. तर आता भारतातही ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत भर पडत होत आहे. देशातील ओमायक्रॉन बाधितांचा आकडा ८७ वर पोहोचला आहे.

    या राज्यात ओमायक्रॉनबाधित रुग्णांची वाढ

    देशभरातल्या ओमायक्रॉनबाधितांचा आकडा वाढताना दिसत आहे. कर्नाटक, तेलंगणा, दिल्ली आणि  गुजरातमध्ये काल एका दिवसात १४ रुग्ण वाढले. तर इकडे महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे सध्या ३२ रुग्ण आहेत. तर त्या खालोखाल राजस्थानात १७ ओमायक्रॉन बाधित आहेत.

    देशभरातील कोरोना रुग्णसंख्या

    देशभरात गुरुवारी सुमारे ८ हजार कोरोनारुग्ण वाढले आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्ण ८७ हजार झाले आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी आढावा घेतला. केंद्रशासीत प्रदेशातल्या आरोग्यसुविधांचीही माहिती घेतली.