प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

देशात ऑमीक्रोन संसर्गाचा धोका वाढलेला असताना दुसरीकडे शाळांमध्ये कोरोनाचा संसर्गही वाढत चालला आहे. दीर्घ कालावधीनंतर अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, आता शाळांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यावरून शाळांमध्ये कोरोनाची दहशत परतल्याचे व शाळांना टाळे लागणार असल्याचे दिसत आहे(Omicron blast in Tamil Nadu; Corona infection increased in schools).

  दिल्ली : देशात ऑमीक्रोन संसर्गाचा धोका वाढलेला असताना दुसरीकडे शाळांमध्ये कोरोनाचा संसर्गही वाढत चालला आहे. दीर्घ कालावधीनंतर अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. मात्र, आता शाळांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले आहेत. यावरून शाळांमध्ये कोरोनाची दहशत परतल्याचे व शाळांना टाळे लागणार असल्याचे दिसत आहे(Omicron blast in Tamil Nadu; Corona infection increased in schools).

  हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, हरयाणा आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये शेकडो शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून थंडी आणि परिक्षांचा हंगाम यामुळे पालकांच्याही चिंता वाढल्या आहेत.

  हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील सरकारी हायस्कूल देलागमध्ये एकाचवेळी 23 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सर्व बाधित मुलांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांची तपासणी सुरू आहे. पश्चिम बंगालच्या नादिया जिल्ह्यातील नवोदय केंद्रीय विद्यालयातील 29 मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने चिंता व्यक्त करण्यात आली.

  शाळेतील उर्वरित विद्यार्थी आणि शिक्षकांचीही करोना तपासणी केली जात आहे. त्यामुळे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सर्व बाधित मुलांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.  पंजाबमध्ये तीन दिवसांत विविध शाळांमधील सुमारे 25 मुले कोरोनाच्या विळख्यात आली आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या विळख्यात आलेल्या बालकांची संख्या 50 च्या पुढे गेली आहे. मात्र, यापैकी 25 शालेय विद्यार्थी आहेत.

  तामिळनाडूत ऑमीक्रोनचा स्फोट; एकाचवेळी 33 बाधित, 17 राज्यांत शिरकाव

  ऑमीक्रोनमुळे देशाच्या चिंतेत दररोजच भर पडत आहे. तामिळनाडूत गुरुवारी पुन्हा तब्बल 33 नव्या ओमायक्रॉनबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे तामिळनाडूत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्याचे आरोग्यमंत्री एम. सुब्रमण्यम यांनी याबाबत माहिती दिली. तामिळनाडूत एकूण 34 रुग्ण आढळले आहेत. काही दिवसांपूर्वीच एक जणाचा अहवाल हा ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला होता. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये चेन्नईत 26, सलेममध्ये 1, मदुरैत 4 आणि तिरुवनमलाईमध्ये 2 रुग्ण आढळले आहेत.बाधितांच्या या संख्येसह देशभरात रुग्णसंख्या 287 वर पोहोचली आहे.