महिन्याच्या पहिल्या शनिवारी मंत्री, नेते गावकऱ्यांना भेटणार; जयंत पाटील यांची माहिती

येत्या वर्षात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपआपल्या गावातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते उपस्थित असणार आहेत. गांव व राज्यासमोरील प्रश्नावर चर्चा करत विकासाला गती देण्यासाठी कार्यरत असतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली

    इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : येत्या वर्षात दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपआपल्या गावातील प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री, नेते उपस्थित असणार आहेत. गांव व राज्यासमोरील प्रश्नावर चर्चा करत विकासाला गती देण्यासाठी कार्यरत असतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिली.

    साखराळे (ता.वाळवा) येथे मुस्लिम दफन भूमी, भैरवनाथ मंदीर सुशोभिकरण,तळे सुशोभिकरण तसेच विविध रस्त्यांच्या कामांचा जयंत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, पं.स.उपसभापती नेताजीराव पाटील, सरपंच बाबुराव पाटील, उपसरपंच तजमुल चौगुले उपस्थित होते.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून गावा-गावात सेवादलाची मजबूत बांधणी करून सेवादलाच्या माध्यमातून राज्यात वैचारिक कार्यकर्त्यांची जडणघडण करण्यात येणार आहे. २०२४ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यातील नंबर १ चा पक्ष बनविण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्याच्या पाटबंधारे खात्याच्या वतीने वाळवा तालुक्या सह आठ गावातील क्षारपड जमीन सुधारण्या चे ३० प्रस्ताव केलेले आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू आहे. यातून निधी आल्या नंतर आपल्या भागातील क्षारपड जमीन सुधारण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागू शकतो. यावेळी आपण दिलेल्या निवेदनांचा निश्चित पाठ पुरावा करू.

    – जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष.

    साखराळे येथील विविध विकास कामांचा शुभारंभ

    विजयराव पाटील म्हणाले,आपल्या भागात क्षारपड जमिनीचा प्रश्न गंभीर आहे. पाटबंधारे खात्याच्यावतीने तालुक्यातील गावांचे क्षारपड जमीन सुधारणा प्रस्ताव केले आहेत. ते लवकरच मार्गी लागतील. पाणंद रस्त्यांच्या साठी निधी मिळावा.
    प्रारंभी सरपंच बाबुराव पाटील यांनी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयंत पाटील यांनी साखराळेच्या विकासाला भर भरून निधी दिल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत काही विकास कामे सुचविली.

    यावेळी अविनाश पाटील, शिवाजी डांगे, भास्कर पाटील, शैलेंद्र सूर्यवंशी, अलका माने, पी.बी. सुर्वे, राजेंद्र पाटील, विनोद बाबर, सुनील पाटील, सुशील पाटील, प्रताप पाटील, डी.एम. पाटील, अमोल कुंभार, हमीद मुल्ला, सुधीर चिवटे, जयकर डांगे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच तजमुल चौगुले यांनी आभार मानले. प्रा. अमोल पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

    पालकमंत्री जयंत पाटील यांचे मूळ गाव कासेगाव आहे. पण ते साखराळे येथे राजाराम बापू  कारखाना परिसरात राहतात. तेथेच नागरिकांशी संपर्क साधतात. त्यामुळे आपण दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी साखराळे येथे येणार असल्याची माहितीही मंत्री पाटील यांनी दिली.