
खटाव तालुक्यातील एकमेव आणि एकूण १७ प्रभाग असलेल्या वडूज नगरपंचायत निवडणूक मतदान मंगळवारी २१ डिसेंबर रोजी होत आहे. २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख १ डिसेंबर ते ७ डिसेंबर तर अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम तारीख १३ डिसेंबर या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे २८ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले आहेत.
वडूज : खटाव तालुक्यातील एकमेव आणि एकूण १७ प्रभाग असलेल्या वडूज नगरपंचायत निवडणूक (Vaduj Nagar Panchayat Election) मतदान मंगळवारी २१ डिसेंबर रोजी होत असून, २२ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. अर्ज भरण्याची तारीख १ डिसेंबर ते ७ डिसेंबर तर अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम तारीख १३ डिसेंबर या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत सुमारे २८ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यात आले आहेत.
एकूण १७ प्रभागातील १७ जागांपैकी १३ प्रभागातील १३ जागांसाठी एकूण ५८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. तर प्रभाग क्र. १,५,१५,१७ या चार प्रभागात ओबीसी आरक्षण असल्याने न्यायालयीन बाब असल्याने वगळले आहेत.
या नगरपंचायतची आरक्षण रचना
प्रभाग क्र. – १ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला.
प्रभाग क्र. – २ सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. – ३ सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. – ४ सर्वसाधारण.
प्रभाग क्र. – ५ नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला).
प्रभाग क्र. – ६ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. – ७ सर्वसाधारण महिला.
प्रभाग क्र. – ८ सर्वसाधारण
प्रभाग क्र. – ९ सर्वसाधारण
प्रभाग क्र. – १० अनुसूचित जाती जमाती (महिला)
प्रभाग क्र. – ११ अनुसूचित जाती
प्रभाग क्र. – १२ सर्वसाधारण
प्रभाग क्र. – १३ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. – १४ नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्र. – १५ सर्वसाधारण महिला
प्रभाग क्र. – १६ सर्वसाधारण
प्रभाग क्र. – १७ नागरिकांचा मागास प्रवर्ग याप्रमाणे आहे.
तर उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले प्रभागनिहाय संख्या
प्रभाग-२/०, प्रभाग ३/३, प्रभाग ४/२, प्रभाग ६/१, प्रभाग ७/१, प्रभाग ८/२, प्रभाग ९/४, प्रभाग १०/०, प्रभाग ११/१, प्रभाग १२/५, प्रभाग १३/०, प्रभाग १५/५, प्रभाग १६/४ अशा एकूण १३ प्रभागातून २८ उमेदवारानी अर्ज माघारी घेतले आहेत.
एकंदरीत १३ प्रभागातून १३ जागांसाठी सुमारे ५८ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.