कार्यक्रमातील भाषणाच्या निमित्ताने सरकारच्या कारभारावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना मुख्यमंत्र्याच्या कानपिचक्या

मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकजण जरा काही झाले की, महानगरपालिका आणि नगरेसवकांवर खापर फोडतात. सातत्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण फक्त प्रश्न विचारायला फार अकलेची गरज नसते, असे मला वाटते. तुम्ही काय करता, हेदेखील सांगावे, असे म्हणत मुख्यमंत्र्यानी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

    मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यानी आज दूरस्थ संपर्क व्यवस्थेव्दारे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कारभारावर सातत्याने टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना अप्रत्यक्ष टिपणी करत कानपिचक्या दिल्या.

    मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकजण जरा काही झाले की, महानगरपालिका आणि नगरेसवकांवर खापर फोडतात. सातत्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. पण फक्त प्रश्न विचारायला फार अकलेची गरज नसते, असे मला वाटते. तुम्ही काय करता, हेदेखील सांगावे, असे म्हणत मुख्यमंत्र्यानी विरोधकांवर नाव न घेता टीका केली.

    निवडणुका झाल्यावर ते ताठ होतात

    मुख्यमंत्री म्हणाले की, अनेकजण निवडणूकीत मते मागताना जनतेसमोर झुकले असतात. पण निवडणुका झाल्यावर ते ताठ होतात, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, महानगरपालिका काम करते म्हणजे लोकांवर उपकार करत नाही. पण महानगरपालिकेच्या कामाचा आवाका किती मोठा आहे, हे देखील या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे.

    माझे साथीदार खंबीर आहेत

    या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडीतील आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक केले. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हा निर्णय माझ्या नेतृत्वाखाली झाला, असे म्हणतात. पण पण माझे साथीदार खंबीर आहेत, खांद्याला खांदा लावून साथ देत आहेत, त्यामुळेच मी हे काम करु शकत आहे. हे टीमवर्क आहे. तुमच्यासारख्या सहकाऱ्यांमुळेच मी लोकप्रिय मुख्यमंत्री झालो. महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी साथ दिली नसती तर मुंबई महानगरपालिकेचे जागतिक स्तरावर कौतुक झाले नसते, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.