अभिमानास्पद! सिंधुदुर्ग दौर्‍यावर उपमुख्यमंत्री यांच्या गाडीच्या सारथी बनल्या तृप्ती मुळीक ; मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य महिलेने केल्याची पहिलीच घटना

तृप्ती मुळीक यांनी नुकताच व्हीआयपी सेक्युरिटी ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आहे.महिलांच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करून त्यांच्या सक्षमीकरणाचा वारसा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे नेल्याची भावना जनमानसात यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

    सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग दौर्‍यावर आज (२६ डिसेंबर )उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचं सारथ्य एका महिलेने केले आहे. तृप्ती मुळीक असे या महिलेचे नाव असून त्या पोलिस दलातील महिला चालक आहेत. राज्यात मंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य एका महिलेने केल्याची ही पहिलीच घटना आहे.