हिंगोली जिल्ह्यात तुरीला एकरी एका पोत्याचा उतारा; लावगड खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल

    हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये यावर्षी खराब हवामानाचा फटका बसून तुरिचे पीक उभेच करपून गेल्याने एकरी एका पोत्याचा उतारा येत असल्यामुळे तूर उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.

    जिल्ह्यातील सुलदली,नागा सिनगी व इतर परिसरामध्ये तुरीला लावगड केलेला खर्चही वसूल होत नसल्याने मळणी यंत्राच्या साह्याने यावर्षी तूर न काढता पारंपारिक पद्धतीनेच कमी खर्चात तुर बडवुन घरी आणणे शेतकऱ्यांनी पसंत केल्याचे दिसून येत आहे.

    निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्याचा रब्बी हंगाम हा पूर्णपणे धोक्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाला असून त्यांनी प्रशासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.