Suicide of a married woman within ten days

मुलींचा जन्मदर गेल्या काही काळात खूप घटला आहे. त्यामुळे अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशात लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलींच्या आपल्या भावी वराकडून असणाऱ्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबांतील मुलांचे लग्न होणे आणखीनच अवघड झाले आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका गावामध्ये या समस्येमुळे खूप लोक त्रस्त आहेत(Panchayat Settlement For Marriage).

    जळगाव : मुलींचा जन्मदर गेल्या काही काळात खूप घटला आहे. त्यामुळे अनेक मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. अशात लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलींच्या आपल्या भावी वराकडून असणाऱ्या अपेक्षा खूपच वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबांतील मुलांचे लग्न होणे आणखीनच अवघड झाले आहे. महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एका गावामध्ये या समस्येमुळे खूप लोक त्रस्त आहेत(Panchayat Settlement For Marriage).

    पाटिदार समाज या समस्येने ग्रस्त आहे. या गावात जवळपास निम्मे तरुण 30 पेक्षा जास्त वयाचे असूनही, अद्याप अविवाहित आहेत. या गावात विवाहेच्छुक पुरुषांची संख्या संभाव्य वधूंपेक्षा खूप जास्त आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ भागातील पंचायतीने या समस्येवर उपाय म्हणून एक तोडगा काढला आहे.

    या लोकांनी येथील अविवाहित तरुणांची अनाथाश्रमातीलमुलींशी लग्न लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या मुलींच्या सामाजिक सुरक्षिततेची हमी मिळावी म्हणून वरांना एका अटीची पूर्तता करावी लागेल. ती म्हणजे वराने त्याच्या संपत्तीतील 30% ते 50% संपत्ती विवाह सोहळ्यापूर्वी वधूच्या नावे करावी. या मुली ज्या अनाथाश्रमांतील आहेत त्यांच्या वतीने ही मागणी केली जाते.

    गेल्या अनेक दिवसांपासून भोरगाव लेवा पाटील समाजातील लोकांना आपल्या मुलांसाठी वधू मिळणे खूप अवघड झाले आहे. विशेष म्हणजे या वर्षी 190 मुलींनी लग्नासाठी नोंदणी केली आहे मात्र त्यांच्याशी लग्न करण्यास इच्छुक असलेल्या भावी वरांची संख्या 625 एवढी आहे.

    गेल्या काही वर्षांपासून वधू-वरांच्या संख्येत मोठी तफावत निर्माण झाली आहे. पंचायतीने घेतलेल्या निर्णयानुसार अनाथाश्रमातील महिलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे लग्न समाजातील तरुणांशी करून दिले जाईल. जवळच असलेल्या चाळीसगाव येथे या पूर्वी असे विवाह लावण्यात आले आहेत.