अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकासह अन्य मागण्याही कागदावरच; उच्च न्यायालयात जनहित याचिका

साहित्यिक कलावंत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ग्रथालय या संस्थेच्यावतीने ३१ ऑगस्ट २००३ रोजी तात्कालीन मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत १३ मागण्या केल्या होत्या. त्यापैकी अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील घाटकोपर येथील घराचे सुशोभिकरण करणे आणि मुंबई त्यांचे भव्य स्मारक उभारणे, अण्णाभाऊ साठे नामफलक असलेले एल.वी.एस मार्ग येथे प्रवेशद्वार बनविणे, जिजामाता उद्यान येथे खुले नाट्यगृह शासनाने सुरू करून संस्थेला कायमस्वरुपी चालविण्यास देणे, तसेच मुंबईतच अण्णाभाऊ साठेच्या नावे ग्रंथालय उभारणे इ. पाच मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या.

    मुंबई (Mumbai) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या मुंबईतील स्मारकासह अन्य काही प्रलंबित मागण्या २००३ पासून कागदावरच राहिल्या आहेत. त्यापैकी अणाभाऊ साठे यांच्या घराबाबत शासन निर्णय होऊनही अद्याप पुर्तता झालेली नाही, असा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहेत.

    साहित्यिक कलावंत आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ग्रथालय या संस्थेच्यावतीने ३१ ऑगस्ट २००३ रोजी तात्कालीन मुख्यमंत्र्यासोबतच्या बैठकीत १३ मागण्या केल्या होत्या. त्यापैकी अण्णाभाऊ साठे यांचे मुंबईतील घाटकोपर येथील घराचे सुशोभिकरण करणे आणि मुंबई त्यांचे भव्य स्मारक उभारणे, अण्णाभाऊ साठे नामफलक असलेले एल.वी.एस मार्ग येथे प्रवेशद्वार बनविणे, जिजामाता उद्यान येथे खुले नाट्यगृह शासनाने सुरू करून संस्थेला कायमस्वरुपी चालविण्यास देणे, तसेच मुंबईतच अण्णाभाऊ साठेच्या नावे ग्रंथालय उभारणे इ. पाच मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या. जिजामाता उद्यानातील खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याची तरतुद करण्यात आली आणि त्यासाठी लागणारा निम्मा निधी मनपा आणि उवर्रित निधी सामाजिक न्याय विभागाकडून मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्यापही कोणत्याही मागण्यांची पूर्तता झालेली नाही, म्हणून अण्णाभाऊ साठे सार्वजनिक ग्रंथालय संस्थेचे अध्यक्ष शहाजीराव थोरात यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.

    तसेच याप्रकरणी २०१७ साली तात्कालीन मुख्यमंत्र्याच्या उपस्थित अण्णाभाऊ साठेंच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी स्मारक समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या समितीमध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या लढ्यात सहभागी असलेल्या कोणाचाही सहभाग नसल्याने याचिकाकर्त्यांनी समितीलाही याचिकेत विरोध केला आहे. सदर याचिकेवर नुकतीच मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. याचिकेची दखल घेत खंडपीठाने प्रतिवादींना नोटीस बजावण्याचे निर्देश देत सुनावणी १७ जानेवारी २०२२ रोजी निश्चित केली.