…अन्यथा शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील : पंजाबराव पाटील

सरकारने शेतीपंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, दूधाची खरेदी किलोमध्ये व लिटरमध्ये केल्यास त्याप्रमाणे पावती व बिल द्यावे आणि राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्रीला परवानगी या गोष्टींवर सरकारने गुरुवारपर्यंत (दि.२३) निर्णय जाहीर करावा.

    कराड : सरकारने शेतीपंपाला दिवसा आठ तास मोफत वीजपुरवठा, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान, संपूर्ण कर्जमाफी, दूधाची खरेदी किलोमध्ये व लिटरमध्ये केल्यास त्याप्रमाणे पावती व बिल द्यावे आणि राज्यात गुंठेवारी खरेदी-विक्रीला परवानगी या गोष्टींवर सरकारने गुरुवारपर्यंत (दि.२३) निर्णय जाहीर करावा. अन्यथा, शेतकरी ‘गेटवे ऑफ इंडिया’ येथे समुद्रात जलसमाधी घेतील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील (Punjabrao Patil) यांनी दिला.

    दरम्यान, याबाबतचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. यासंदर्भात येथील शासकीय विश्रामगृहात सोमवारी पंजाबराव पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

    महावितरणने शेती पंपाचे वीज बिल ऊस बिलातून कापून घेण्याबाबत सांगितले आहे. जिल्ह्यातील काही नेत्यांनीही शेती पंपाचे वीज बिल ऊस बिलातून कट करून घ्या, असे वक्तव्य केले आहे. हा शेतकऱ्यांवर अन्याय असून असे झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभे केले जाईल.

    – पंजाबराव पाटील