भरधाव आणि अनियंत्रित वाहन झाडावर आदळले; एकाचा मृत्यू

भंडाऱ्यावरुन एक अवैध प्रवासी वाहन 15 प्रवाशांना घेऊन भरधाव वेगाने तुमसरकडे निघाले होते. दरम्यान मोहाडी जवळ पुडके फर्निचर मार्ट जवळ अचानक समोरुन येणाऱ्या ऑटो गाडी वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला हे वाहन आदळलं.

    भंडारा (Bhandara) : अनियंत्रित प्रवासी वाहन झाडाला आदळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर 14 लोक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी येथील पुडके फर्निचर दुकानाजवळ घडली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

    भंडाऱ्यावरुन एक अवैध प्रवासी वाहन 15 प्रवाशांना घेऊन भरधाव वेगाने तुमसरकडे निघाले होते. दरम्यान मोहाडी जवळ पुडके फर्निचर मार्ट जवळ अचानक समोरुन येणाऱ्या ऑटो गाडी वाचविण्याच्या प्रयत्नात अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला हे वाहन आदळलं.

    या भीषण अपघातात प्रभाकर हेडाऊ नामक 65 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू झाला असून 14 प्रवासी गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एस टी संप असल्याने प्रवासी खाजगी वाहतुकीच्या साधनांना महत्व देत असल्याने या अवैध वाहतुकीमुळे अनेक अपघातांना आमंत्रण मिळत आहे.