नशेत लग्नात गोंधळ घालणं पडलं महागात! बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या भावाला अटक, न्यायालयात केलं हजर

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम गर्ग याला अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

लोकांच्या मनातलं ओळखुन समस्या सांगण्यामुळे प्रकाशझोतात आलेले बागेश्वर धाम यांच्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. पंडित धीरेंद्रकृष्ण (Dhirendra Krishna Shastri) यांचा भाऊ शालिग्राम गर्ग (Shaligram Garg) याला छतरपूर पोलिसांनी गुरुवारी अटक केली त्याला छतरपूर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

नेमकं काय प्रकरण

गेल्या ११ फेब्रुवारीला बमिठा येथील गाढा गावात एका दलित कुटुंबातील मुलीचा विवाह होता. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा भाऊ शालिग्राम याने दारूच्या नशेत लग्नात प्रचंड गोंधळ घातला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये तो हातात पिस्तुल आणि तोंडात सिगारेट घेऊन गोंधळ घालताना दिसत होता या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यांनतर त्याला अटक करण्यात आली.  न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.