Pankaja Munde's activists get angry, BJP's office is blown up

भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा डावलण्यात आल्यामुळे औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यां बरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेतेही नाराज झाल्याचे समोर आले आहे(Pankaja Munde's Activists Get Angry, BJP's office is blown up).

    औरंगाबाद : भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी पुन्हा एकदा डावलण्यात आल्यामुळे औरंगाबादमध्ये पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी भाजप कार्यालयाची तोडफोड केली. तर दुसरीकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यां बरोबरच राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेतेही नाराज झाल्याचे समोर आले आहे(Pankaja Munde’s Activists Get Angry, BJP’s office is blown up).

    परभणीतील गंगाखेड पंचायत समितीच्या रासपच्या सभापती छाया मुंडे यांनी तर थेट भाजपला गंगाखेड तालुक्यातून हद्दपार करण्याची पोस्ट सोशल माध्यमांवर शेअर केली आहे. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. परभणीच्या गंगाखेड तालुक्यात भाजप आणि विशेषतः पंकजा मुंडे यांचे समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांच्याकडून आता भाजप बाबतची नाराजी उघड होऊ लागली आहे.

    तसेच भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष जगन्नाथ आंधळे यांनी आपण आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची पोस्ट फेसबुक वर शेअर केली आहे. एकूणच पंकजा मुंडे यांना सातत्याने डावलण्यात येत असल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये मोठी नाराजगी पसरली आहे. हे समर्थक आता सोशल माध्यमांमध्ये उघडपणे भाजपला विरोध करताना दिसत आहेत.

    औरंगाबाद-उस्मानपुरा भागातील भाजप कार्यलयासमोर देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पंकजा मुंडे यांना तिकीट मिळाले नाही म्हणून भाजपच्या कार्यालयाची तोडफोड देखील करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. हे कार्यकर्ते भाजपचे अथवा पंकजा मुंडे यांचे नाहीत. हा हल्ल्याचा प्रयत्न शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा असू शकतो असे वक्तव्य भाजपचे शहराध्यक्ष संजय केनेकर यांनी केले आहे.