फेक एन्काउंटर घडविण्याचा परमवीर सिंग, वाझेचा डाव होता

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आम्ही सरकार पाडणार नाही. ते पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ, अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार नसल्याचे ते स्वीकारत आहेत. २०२४ साली हे महाविकास आघाडी सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नव्हे, तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे. भाजप नेते विनोद तावडे यांना मागील निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारले होते.

    पुणे (Pune) : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या ॲन्टिलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवण्याचा कट तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि सचिन वाझे यांनी रचला होता. या कटाच्या नियोजनात एका गुंडाचा बनावट पासपोर्ट तयार करण्यात आला. त्याचा फेक एन्काउंटर करण्याचा या दोघांचा डाव होता, असा आरोप अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला. तो पासपोर्ट एनआयए तपास यंत्रणेला मिळाला आहे. एनआयएने ही माहिती जनतेसमोर उघड करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

    पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने बुधवारी आयोजित वार्तालापात ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते. मलिक म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता आम्ही सरकार पाडणार नाही. ते पडल्यास आम्ही नवे सरकार देऊ, अशी भूमिका मांडत आहेत. त्यामुळे हे सरकार पडणार नसल्याचे ते स्वीकारत आहेत. २०२४ साली हे महाविकास आघाडी सरकार पुन्हा राज्यात सत्तेत येईल. हे सरकार केवळ पाच वर्षांसाठी नव्हे, तर २५ वर्षांसाठी एकत्र आले आहे. भाजप नेते विनोद तावडे यांना मागील निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारले होते. परंतु ते सध्या भाजपचे राष्ट्रीय महासचिव असून, त्यांच्यावर महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी दिली आहे. त्यावरून भाजपमध्ये अंतर्गत राजकारण बदलत असल्याचे दिसून येत आहे, असे सांगत मलिक यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

    विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्याविरोधात एक हजार कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या संदर्भात मलिक म्हणाले, दरेकर यांच्या विरोधात काहींनी होर्डिंग लावले, त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. मुंबई सहकारी बॅंकेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येत असून, त्यातील गौडबंगाल बाहेर आणू.