बापरे! उडत्या विमानात पायलटची प्रकृती खालावली; सगळयांचा जीव टांगणीला, मग एका प्रवाशाने केले असे काही की…

वैमानिकाची तब्येत अचानक बिघडली आणि वैद्यकीय आणीबाणीसाठी त्याला तातडीने कॉकपिटमधून बाहेर काढावे लागले. यादरम्यान विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पुढाकार घेतला. विमान चालवण्यात त्यांनी सहवैमानिकाला मदत केली. काही वेळात विमान उतरले.

विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे विमानाची इमर्जन्सी लॅन्डींग (emergency landing) करण्यात आल्याच्या घटना आपण नेहमी वाचत असतो. मात्र, विमानाने उड्डाण घेतल्यानंतर जर प्रवासात पायलटचीच तब्येत खराब झाली अणि तो विमान उडवण्यात असमर्थ ठरला तर…वाचूनच अंगावर काटा आला ना! पण हे प्रत्यक्षात घडलयं अमेरिकेत. एक प्रवासी विमान हवेत उडत होते. त्यानंतर त्यांच्या पायलटची प्रकृती खालावली. तात्काळ वैद्यकीय आणीबाणीसाठी त्याला कॉकपिटमधून बाहेर काढावे लागले. यादरम्यान विमानात प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने पुढाकार घेत नेमंक काय केल वाचा.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, साउथवेस्ट एअरलाइन्सच्या विमानाने लास वेगासहून कोलंबस, ओहायोला उड्डाण केले. विमानाच्या उड्डाणानंतर काही वेळातच वैमानिकाची प्रकृती अचानक बिघडली. असा वैद्यकीय आणीबाणीच्या परिस्थितीत, विमानाला लास वेगासमध्ये परत उतरण्यास सांगण्यात आले. सुदैवाने  विमानातील एक प्रवासी विमान हाताळण्यासाठी पुढे आला. तो एक व्यावसायिक पायलट होता आणि दुसऱ्या विमान कंपनीत काम करत होता. तो कॉकपिटमध्ये आला आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क साधला. त्याचवेळी विमानाच्या सहवैमानिकाने उड्डाणाचा ताबा घेतला. (Plan lands By Passenger) काही वेळाने फ्लाइट 6013 ने सुरक्षित लँडिंग केले. साउथवेस्ट एअरलाइन्सचे प्रवक्ते ख्रिस पेरी यांनी सांगितले की, दुसर्‍या एअरलाइन्सच्या पायलटने फ्लाइट डेकमध्ये प्रवेश केला आणि आमच्या साउथवेस्ट पायलटने विमान उडवले तेव्हा रेडिओ संप्रेषणात मदत केली.