रेल्वेत प्रवाशांना व्हॉट्सॲपवरून ऑनलाइन जेवण ऑर्डर करता येणार!  या क्रमांकावरुन मागवा तुमचं आवडता पदार्थ

रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की, रेल्वेने आपल्या ई-कॅटरिंग सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रवासी आता व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकतात

    भारतीय रेल्वेने (Indian Railways) आपण नेहमी प्रवास करतो. या प्रवासादरम्यान रेल्वेकडून जेवण पुरवण्यात येत. मात्र हे जेवण सगळयांना रुचतं असं नाही त्यामुळे अनेक जण घरुन किंवा बाहेरु हॅाटेलमधुन आधीच घेऊन येतात. मात्र अशा प्रवाशांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता प्रवासी त्यांचा पीएनआर नंबर वापरून प्रवासादरम्यान व्हॉट्सॲपद्वारे स्थानकांवर उपलब्ध असलेल्या रेस्टारंटमधून (WhatsApp) ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकतात.

    रेल्वे मंत्रालयाच्या माहीतीनुसार, रेल्वेने आपल्या ई-कॅटरिंग सेवा अधिक ग्राहक-केंद्रित करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. याद्वारे भारतीय रेल्वेने अलीकडेच रेल्वे प्रवाशांना ई-कॅटरिंग सेवेद्वारे जेवण ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअॅप वापरण्याचा पर्याय दिला आहे. यासाठी व्हॉट्सॲप क्रमांक +91-8750001323 सुरू करण्यात आला आहे.

    सुरुवातीला, व्हॉट्सॲप कम्युनिकेशनद्वारे ई-कॅटरिंग सेवा दोन-टप्प्यांत लागू करण्याची योजना आखण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात, व्यवसाय WhatsApp क्रमांक ई-तिकीट बुक करणाऱ्या ग्राहकांना www.ecatering.irctc.co.in या लिंकवर क्लिक करून ई-कॅटरिंग सेवा निवडण्यासाठी संदेश पाठवेल. या पर्यायासह, ग्राहकांना अॅप डाउनलोड न करता थेट आयआरसीटीसीच्या ई-कॅटरिंग वेबसाइटवरून स्थानकांवर उपलब्ध त्यांच्या पसंतीच्या रेस्टॉरंटमधून त्यांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बुक करता येतील.

    पुढील टप्प्यात, व्हॉट्सअॅप क्रमांक ग्राहकांसाठी अशी यंत्रणा असणार ज्याद्वारे प्रवासी आणि ई-कॅटरिंग सेवा यांच्यामधे समन्वय साधला जाईल आणि ग्राहकांसाठी जेवण बुक करणार. सुरुवातीला, ग्राहकांच्या प्रतिक्रिया आणि सूचनांच्या आधारे निवडक गाड्यांमध्ये ई-कॅटरिंग सेवांसाठी WhatsApp कम्युनिकेशन लागू करण्यात आले आहे. हे कालांतराने इतर गाड्यांना वाढवले ​​जाईल.