निरव मोदीच्या मालमत्ताच्या लिलावातून कर्जाची वसुली करण्याचा मार्ग मोकळा

पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुक प्रकरणी विदेशात अटक करण्यात आलेला हिरे व्यापारी निरव मोदी यांच्या कंपन्यांच्या मालकीच्या लिलावातून कर्जाची वसुली करण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.  

  मुंबई : पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुक प्रकरणी विदेशात अटक करण्यात आलेला हिरे व्यापारी निरव मोदी यांच्या कंपन्यांच्या मालकीच्या लिलावातून कर्जाची वसुली करण्याचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सांगण्यात येत आहे.  मोदी यांच्या मुंबई फोर्ट येथील ऱ्हिदम हाऊस या हेरिटेज इमारतीचा लिलाव होण्याची शक्यता आहे.

  यासाठी सक्तवसुलीसं चलनालय (ईडी)ने या इमारतीचा ताबा सोडल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

  ईडीने इमारतीचा ताबा सोडला

  पंजाब नॅशनल बँकेच्या फसवणुक प्रकरणी ही कारवाई सुरु आहे. या इमारतीवर त्यापूर्वी इडीने टाच आणली होती. मात्र विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार आता ईडीने या इमारतीचा ताबा सोडला आहे. त्यामुळे तिचा लिलाव करणे बँकांना शक्य होईल व त्यातून मोदीने थकवलेले पैसे वसूल केले जातील अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.

  लिलाव करून पैसे वसूल करणे शक्य

  निरव मोदींच्या फायरस्टार डायमंड इंटरनॅशनल ने ही इमारत २०१७ मध्ये खरेदी केली होती. एनसीएलटीने यापूर्वीच या मालमत्तांचा लिलाव करण्याचा आदेश दिला होता. मात्र हवाला प्रकरणाची चौकशी करणाऱ्या ईडीच्या ताब्यात ती मालमत्ता असल्याने त्यांचा लिलाव करता येत नव्हता. आता ईडी ने न्यायालयाच्या आदेशानुसार अन्य मालमत्तांचा ताबाही सोडून दिल्यामुळे त्यांचा लिलाव करून पैसे वसूल करणे शक्य होईल. दरम्यान, मोदी सध्या लंडनमध्ये असून त्याला भारतात आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.