सांगलीत उद्या पेन्शन संघर्ष मेळावा; मुंबई ते नागपूर संघर्ष यात्रेत सर्व संघटना एकवटल्या

शासकीय, निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचारी एकवटले आहेत. जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून २२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानातून पेन्शन संघर्ष यात्रा निघाली आहे.

    सांगली : शासकीय, निमशासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांना लागू असलेली राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सरकारी कर्मचारी एकवटले आहेत. जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीच्या माध्यमातून २२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानातून पेन्शन संघर्ष यात्रा निघाली आहे.

    महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांचा प्रवास करत या यात्रेची सांगता सात डिसेंबर रोजी सेवाग्राम वर्धा येथे होणार आहे. यात्रेच्या सहाव्या दिवशी शनिवार, २७ रोजी सांगली येथे पेन्शन संघर्षयात्रेचे स्वागत व पेन्शन संघर्ष मेळाव्याचे आयोजन केले आहे, अशी माहिती सांगली जिल्हा जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिली.

    यात्रा समन्वय समिती सांगलीचे सुभाष मरिगुद्दी, पी. एन. काळे, दत्तात्रय शिंदे, सागर बाबर, बाबासाहेब लाड, विनायक शिंदे, महेश शरणाथे, अमोल माने, भानुदास चव्हाण, धैर्यशील पाटील, राहुल कोळी, विरेश हिरेमठ, प्रशांत कोळी पेन्शन संघर्ष यात्रेच्या यशस्वीतेसाठी समन्वय समितीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत.

    या संघटनांनी दिला पाठिंबा

    सांगली जिल्ह्यातील जिल्हा परिषद कर्मचारी संघटना, मध्यवर्ती कर्मचारी संघटना, आरोग्य कर्मचारी संघटना, लिपिक वर्गिया कर्मचारी संघटना, आयटीआय कर्मचारी संघटना, शिक्षक संघ थोरात गट, शिक्षक समिती, शिक्षक संघ शि. द. पाटील गट, शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, पुरोगामी शिक्षक संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ एनपीएस संघर्ष समिती, पदवीधर शिक्षक संघटना, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना आदी ६० संघटनांनी पेन्शन संघर्ष यात्रेस पाठिंबा दिला आहे.