पैशांच्या आशेने लोक काहीही काम करतात; माती खोदून लाखो रुपयांचे हिरे काढणाऱ्यांना मिळतात फक्त 100 रुपये

पैशांच्या आशेने लोक काहीही काम करायला तयार असतात, याचेच जिवंत उदाहरण अलीकडेच पाहायला मिळाले. गरियाबंदपासून 40 किमी अंतरावर मैनपूर ब्लॉकच्या जवळ पायलीखंड नावाचे गाव आहे. या गावातील दाट जंगल असलेल्या पर्वतीय भागातील 40 एकर जमिनीवर खोदकाम केलेले दिसत आहे. इतक्या घनदाट जंगलातही या गावातील लोक खोदकाम करतात, हे बघून सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे(People do anything in the hope of money; Those who dig diamonds worth lakhs of rupees get only 100 rupees). 

    मैनपूर : पैशांच्या आशेने लोक काहीही काम करायला तयार असतात, याचेच जिवंत उदाहरण अलीकडेच पाहायला मिळाले. गरियाबंदपासून 40 किमी अंतरावर मैनपूर ब्लॉकच्या जवळ पायलीखंड नावाचे गाव आहे. या गावातील दाट जंगल असलेल्या पर्वतीय भागातील 40 एकर जमिनीवर खोदकाम केलेले दिसत आहे. इतक्या घनदाट जंगलातही या गावातील लोक खोदकाम करतात, हे बघून सर्वांनाच आश्‍चर्य वाटत आहे(People do anything in the hope of money; Those who dig diamonds worth lakhs of rupees get only 100 rupees).

    या गावातील लोक खोदकाम करून हिरे शोधण्याचे काम करत आहेत. तिथे जमिनीपासून 4 ते 5 फूट खाली खोल खड्डा खोदून त्याखालून हिरे शोधून काढले जात आहेत. या गावातील लोक दिवसभर खोदकाम करत असतात. खोदकाम केल्यानंतर मातीतून हिरे शोधून काढतात. एका हिऱ्याला 100 रुपये मिळतात.

    पायलीखंड या जंगलात फक्त गावातील लोक नाही तर आजूबाजूच्या गावातील लोकदेखील खोदकाम करायला येतात. हे हिरे गावातील लोक व्यापाऱ्यांना विकतात. व्यापारी गावातील लोकांना एका हिऱ्याचे 100 रुपये देतात. 100 रुपये किमतीला घेतलेला चमकणारा तुकडा व्यापारी मात्र हजारो रुपयांना विकतात.

    हे सुद्धा वाचा
    • 2022