आघाडी सरकारच्या कालावधीत दरडोई उत्पन्न सव्वादोन लाख झाले, देशाच्या स्थूल उत्त्पनात महाराष्ट्राचे योगदान 14.2 टक्के

महाविकास आघाडीच्या राजवटीत महाराष्ट्रातील जनतेच सरासरी दरडोई उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढल्याचा दावा आज विधानसभेत सादर कऱण्यात आलेल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-2022 या प्रकाशनात करण्यात आला आहे.

  मुंबई : देशाच्या दरडोई उत्पन्नात घट होत असताना आणि भाजपा शासित राज्यांतील उत्न्नही पुरेसे वाढलेले नसताना महाविकास आघाडीच्या राजवटीत महाराष्ट्रातील जनतेच सरासरी दरडोई उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढल्याचा दावा आज विधानसभेत सादर कऱण्यात आलेल्या महाराष्ट्राची आर्थिक पाहणी 2021-2022 या प्रकाशनात करण्यात आला आहे. हे प्रकाशन पीडीएफमध्ये ऑनलाईन. उपलब्ध करून देण्यात आले आहे.

  गेल्यावर्षा पासून ही नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे. त्या आधी पर्यंत ही आकडवारी अर्थ व सांख्यकी संचालनालया मार्फत मोठ्या पुस्तकाच्या स्वरूपात जनतेला उपलब्ध करून दिली जात असे.

  आर्थिक पाहणी अहवालानुसार देशाच्या स्थूल उत्पन्नात महाराष्ट्राचे योगदान 14.2 टक्के राहील असा अंदाज व्यक्त केला गेला आहे. महत्वपूर्ण म्हणजे दरडोई राज्य उत्पन्न या वर्षी 2.25 लाख रुपये असेल. तर 2019-20 च्या दुसऱ्या सुधारित अंदाजानुसार हे दरडोई उत्पन्न 1.96 लाख रुपये आणि 2020-21 च्या पहिल्या सुधारित अंदाजा नुसार 1.93 लाख रुपये होते.. 2011-12 च्या स्थिर मूल्य आधारा नुसार महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न 1.93 लाख रुपये होते , तर भाजपा शासित राज्य यूपी चे 65,338 रुपये आणि मध्य प्रदेश मध्ये 1.04 लाख रुपये दरडोई उत्पन्न होते.

  या वर्षी 79 हजार कोटीची महसूली तूट अपेक्षित

  2021-22 च्या अर्थसंकल्पीय अनुमानानुसार या वर्षी 3,68,987 करोड़ रुपये चा महसूल मिळणे अपेक्षित होते.. मात्र सुधारित अंदाजा नुसार 79,489 करोड़ रुपये कमी म्हणजे 2,89,498 कोटी रुपये महसूल मिळणार असल्याचा अंदाज आहे. महत्वाची बाब म्हणजे एप्रिल -नोव्हेंबर 2021च्या सुमारास अर्थसंकल्पिय अंदाजाच्या फक्त 49%म्हणजे 1,80,954 कोटी रुपये महसूल जमा झालेला आहे. याच प्रमाणे महसूली खर्च, 3,79,213 कोटी रुपये इतका अपेक्षित होता.. मात्र सुधारित अनुमनानुसार 3,35,675 कोटी रुपये खर्च होण्याचं अपेक्षित आहे. 2021-22च्या अर्थसंकल्पात कर महसूल आणि करेतर महसूल ( केंद्रीय अनुदानासह ) अनुक्रमे 2,85,534 कोटी रुप व 83,435 कोटी रुप अपेक्षित होता. मात्र एप्रिल ते वोन्हेबर 2021 पर्यंतची प्रत्यक्षात महसुली जमा ही 1,80,954 कोटी म्हणजे एव्हढा म्हणजेच अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 49 टक्के इतकाचा आहे.

  महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर, 31 मार्च ला संपत असलेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मधे 12.2 टक्के राहण्याचे पूर्वानुमान आर्थिक सर्वेमध्ये व्यक्त केले गेले आहे. या कालावधीत देशाचा विकास दर 8.9 टक्के वाढ असण्याचा अपेक्षित आहे.

  विधानसभा आणि विधान परिषदेत गुरुवारी महाराष्ट्राचा की आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला यात कृषि आणि संलग्न कार्य क्षेत्रात 4.4 टक्के , उद्योग क्षेत्रात 11.9 टक्के आणि सेवा क्षेत्रात 13.5 टक्के वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे, याच प्रकारे पशु संवर्धन क्षेत्रात 6.9 टक्के , वनीकरण क्षेत्रात 7.2 टक्के आणि मत्स्य व्यवसायात 1.6 टक्के वाढ होण्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.